Kitchen jugaad video: बहुतांश घरांमध्ये सिलिंडरचा वापर जेवण तयार करण्यासाठी होतो. बहुतांश घरात शेगडी जवळ सिलिंडर ठेवण्यात येते. हा सिलिंडर लोखंडापडून तयार केले जातात. ज्यामुळे तो वजनाला फार जड असतात. स्वयंपाकघरात सिलिंडर जिथे ठेवला जाते, त्या ठिकाणी घाणेरडे गंजाचे डाग तयार होतात. डाग कुठेच चांगले दिसत नाहीत. कपड्यावर असो अथवा किचनच्या टाईल्सवर. दिसायला हे खूपच घाण दिसते. पण त्यातही किचनमधील सिलिंडरचे डाग लादीवर उमटले तर लादीची चमक अधिक खराब होते. किचनच्या लादीचा रंग पांढरा असेल तर यावर हे डाग अधिक उठून दिसतात.

तसंच सिलिंडर ज्या भागात ठेवला जातो तिथेही डाग उमटलेले दिसतात. मग अशा वेळी जर स्वच्छता करायची असेल आणि सिलिंडरचे डाग घालवायचे असतील तर मात्र खूप विचार करावा लागतो. पण आता तुम्हाला डोकं खाजवावं लागणार नाही तर किचनमधील सिलिंडरचे डाग घालविण्यासाठी तुम्ही सोप्या हॅक्सचा वापर करा. दरम्यान, गृहिणींसाठी आम्ही एक जुगाड घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला सिलिंडर टिकली लावायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सिलिंडर टिकली कशाला? तर हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या समस्येवर मात करणार आहे. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार तुम्ही सिलिंडर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी टिकलीच्या पाकिटाचा वापर करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला टिकलीच जुनं जे तुम्ही वापरत नाहीये असं पॅकेट घ्यायचं आहे. त्यावरच्या टिकल्या काढून सिलिंडरवर लावल्या तरी चालतील. त्यानंतर हे रिकामं पाकीट तुम्ही सिलेंडरच्या खाली ठेऊन सिलिंडर सहजपणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सरकवून नेऊ शकता. यामुळे टाईल्सवर रेघोट्या पडणार नाहीत आणि सिलिंडर सरकवून नेणं सोपं होऊ शकेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen jugaad: महिलांनो दुधावर टिकली नक्की लावा; मोठ्या समस्येवर उपाय, काय ते VIDEO मध्ये पाहा

@Amy’s Trendy Tips यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)