दूध हे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांना माहीत आहे. दूध प्राचीन काळापासून पौष्टिकतेची खाण मानलं गेलंय. दूध प्यायल्याने एकच लाभ होत नाही तर असंख्य लाभ होतात. पण तुम्ही कधी दुधात कांदा टाकून पाहिलं आहे का? आता तुम्हीही विचारात पडले असेल ना, आम्ही तुम्हाला असं विचित्रच काय विचारतोय, पण दुधात कांदा टाकण्याचा मोठा फायदा आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त असा जुगाड दाखवला आहे. याचा परिणाम असा आहे की पाहूनच तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. किचन जुगाडाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. दरम्यान असाच एक स्वयंपाकघरातील जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी दुधामध्ये कांदा टाकलं आहे का? नाही ना.. मग एकदा दुधामध्ये कांदा टाकून बघा. हा जुगाड तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकेल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा : चहा बनवताना साखर कधी घालायची, उकळण्यापूर्वी की नंतर? दूध कसं टाकायचं? अनेकांना माहित नाही ‘ही’ योग्य पध्दत)

व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने आधी एका वाटीत दोन चमचे दूध घेतलं आहे. त्यानंतर एक अर्धा कांदा घेऊन त्याला सोलून किसून घेतले. या कांद्याचा रस महिलेने दुधात गाळून घेतलं. दूध आणि कांद्याचा रस एकत्र केलं. जर भुवया बारीक, पातळ आणि विरळ असतील तर, काय करावे, असा प्रश्न अनेकींना पडला असेल. काहींचे आयब्रो लहानपणापासून बारीक असतात. जाड भुवया अनेकांना आवडतात. जाड भुवया आपल्या वैशिष्ट्यांवर अधिक सुंदरपणे जोर देतात. तुमच्या विरळ भुवया दाट करण्यासाठी तुम्ही दूध आणि कांद्याच्या रसाचा करण्यात आलेला मिश्रण कापसाच्या बोळ्याने तुमच्या भुवयांवर रात्री झोपण्यापूर्वी लावा, यामुळे भुवया जाड व दाट करण्यासाठी मदत होईल, असे गृहिनीचे म्हणणे आहे.

येथे पाहा व्हिडिओ

Avika Rawat Foods या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)