Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात.एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. हिरवी मिरची सामान्यपणे आपण खाद्यपदार्थांमध्ये वापरतो. पण तुम्ही कधी तिखट मिरचीने कपडे धुतले आहेत का? वाचतानाच तुम्हाला विचित्र वाटेल. कपडे धुवायते तेसुद्धा हिरव्या मिरचीने. हे कसं काय शक्य आहे? पण तुम्हाला हा उपाय जितका विचित्र वाटतो आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त तो फायद्याचा आहे.

शाळा किंवा ऑफिसवरून आल्यानंतर अनेकदा शर्ट किंवा रुमालावर शाईचे डाग दिसून येतात. त्यातच तुमचा गणवेश किंवा शर्ट पांढऱ्या रंगाचा असेल, तर हे डाग अधिकच उठून दिसतात. त्यामुळे हे डाग स्वछ करणे स्त्रियांना कठीण जाते. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका युजरनं शाईचे डाग काढण्याचा सोपा मार्ग दाखवला आहे; जो खरंच खूप उपयोगी आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता गृहिणीने एक ड्रेस घेतला आहे. त्याच्या थोड्याशा भागावर तिने सुरुवातीला व्हिनेगर लावलं. व्हाईट किंवा अॅपल कोणतंही व्हिनेगर चालेलं असं तिनं सांगितलं. यानंतर तिने हिरव्या मिरच्या घेतल्या. या मिरच्या किसणीवर किसून तिने त्या व्हिनेगर लावलेल्या भागावर लावल्या. गृहिणीने यासाठी ताज्या मिरच्याच घेण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यात घटक चांगल्या प्रमाणात असतात. यानंतर गृहिणीने मिरची-व्हिनेगर लावलेला भाग पाण्याने स्वच्छ केला. महिलेने डागावर व्हिनेगर-हिरवी मिरची लावून पाण्याने धुतलं. अगदी मिनिटात हा फार न घासता, मेहनत न घेता गायब झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तुम्ही भेसळयुक्त मीठ तर खात नाही ना? जाणून घ्या कसे ओळखाल, आरोग्यावर होऊ शकतात दुष्परिणाम

@AvikaRawatFoods यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)