Kitchen Tips: जेवण बनवताना फक्त एखादा चविष्ट पदार्थ बनवणे हे टास्क नसते तर त्याबरोबर अनेक लहान-मोठी आव्हानं असतात. ही आव्हानं रोज पुर्ण करत महिला जेवण दररोज जेवण बनवतात. दूध उकळताना उतू जाऊ नये याची काळजी घेणे, एखाद्या पदार्थासाठी लागणारा कांदा व्यवस्थित पण लवकर भाजणे, कारण कांद्यातील पाण्याच्या प्रमाणामुळे त्याला भाजायला खुप वेळ लागू शकतो. अशी लहान मोठी आव्हानं पुर्ण करत गृहिणी रोजचा स्वयंपाक करतात. यांसाठी काही उपाय मदत करतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.

मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी काही सोप्या किचन टिप्स शेअर केल्या आहेत, ज्यांचा वापर करून गृहिणींना जेवण बनवताना खुप मदत होणार आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कोणत्या टिप्स देण्यात आल्या आहेत जाणून घ्या.

आणखी वाचा: चहा करून पावडर फेकून देताय? त्याचे फायदे जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

दूध उतू जाऊ नये म्हणून वापरा ही ट्रिक

दूध उतू जाऊ नये यासाठी दूध उकळताना त्या भांड्यावर लाकडी चमचा ठेवा. यामुळे दूध उकळले तरी ते उतू जाणार नाही, भांड्याबाहेर पडणार नाही.

आणखी वाचा: कांदा कापताना डोळ्यातून येणार नाही पाणी; फक्त वापरा ‘या’ ट्रिक्स

कांदा लवकर कसा भाजायचा?

कांद्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे कांदा भाजायला खुप वेळ लागतो. जर तुम्हाला पटकन कांदा भाजायचा असेल तर त्यात चिमुटभर मीठ किंवा साखर टाका. यामुळे कांदा पटकन भाजतो.

ड्रायफ्रुट्स खुप काळासाठी ताजी कशी ठेवावी?

ड्रायफ्रुट्स खुप काळासाठी ताजी राहावी असे वाटत असेल तर त्यांना एअरटाइट कंटेनरमध्ये किंवा झिपलॉक असणाऱ्यांना बॅगमध्ये ठेवुन फ्रिजमध्ये ठेवा यामुळे ते खुप महिन्यांसाठी फ्रेश राहतील.

आणखी वाचा: मुलांची उंची वाढवण्यासाठी मदत करतील ‘हे’ पदार्थ; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हॉटेलप्रमाणे छोले कसे बनवायचे?

छोले हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. जर तुम्हाला हॉटेलमध्ये जसे छोले मिळतात तसे छोले बनवायचे तशी चव आणि रंग हवा असेल तर एक सोपी ट्रिक मदत करू शकते. एक टी बॅग किंवा चहाची पानं मलमलच्या कपड्यात ठेऊन ते छोले उकळताना त्यात ठेवा, यामुळे छोले अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनतील.