Toilet cleaning ideas: आपल्या प्रत्येकाच्या घरात सुरी असते. भाज्या, फळ, कांदा, टोमॅटो कापण्यासाठी तसेच काहीही वस्तू कापण्यासाठी सूरी हे लागतेच. मात्र या सूरीचे आणखीही काही भन्नाट फायदे आहेत.चाकू तुम्ही कधी टॉयलेटमध्ये वापरून पाहिला आहे का? टॉयलेटमध्ये चाकू वापरण्याचा मोठा फायदा. टॉयलेटमध्ये चाकू वापण्याचा असा परिणाम की तुम्ही विचारही केला नसेल. एका गृहिणीने हा किचन जुगाड दाखवला आहे. ज्यात सुरी किंवा चाकू तुमचं टॉयलेटमधील असं काम करेल, जे करताना तुम्हाला घाण वाटते.

घरात साफसफाई काढली कि गृहिणींच्या नाकी नऊ येतात, छोट्या मोठ्या जागेवरची साफसफाई होऊन जाते पण घरात काही अश्या ठिकाणी साफसफाई कारण म्हणजे मुश्किल होऊन बसतं, जस कि बाथरूम . बाथरूम हा घरातील सगळ्यात अस्वच्छ भाग असतो. साफ सफाईकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर अस्वच्छ होते. आरोग्याच्या दृष्टीने टॉयलेट-बाथरुम स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे. छोट्या छोट्या वस्तू कधी कधी खूप मोठ्या कामाच्या असतात. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नेमकं काय करायचं?

व्हिडीओत पाहू शकता महिलेने टॉयलेटच्या काही भागावर विशेषतः वेस्टर्न टॉयलेटच्या मागच्या बाजूला खाली जो पाईप असतो त्यावर तुम्हाला सिमेंटसारखं काहीतरी दिसेल. इथं तुम्ही हार्पिक टाका आणि ब्रशने घासा तरी ते निघणार नाही. महिलेनं व्हिडीओ ते दाखवलं आहे. पण हाच भाग तुम्ही चाकू किंवा सुरीनं घासला तर ते सहज निघतं.अशाच पद्धतीनं कमोडचा खालचा भाग तोसुद्धा टॉयलेट क्लिनर टाकून स्वच्छ होत नाही, बिलकुल जात नाही. इथंसुद्धा तुम्ही चाकूने घासून पाहा आणि मग कमाल बघा. महिलेनं व्हिडीओत सांगितल्यानुसार तिनं हे करताना टॉयलेट क्लिनर टाकलेलं नाही. टॉयलेट क्लिनर न टाकता फक्त चाकूनं घासून तिनं टॉयलेट स्वच्छ केलं आहे. अशाच पद्धतीने टॉयलेटमधील कोपरेही स्वच्छ करता येतील असं या महिलेनं सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> घरात डासांची दहशत वाढतेय? डासांचा नायनाट करण्यासाठी करा ‘हे’ तीन जबरदस्त उपाय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा हटके जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. @@unik932 युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही सुद्धा हा जुगाड घरच्या घरी करून पाहू शकता. तुमहीही ही ट्रिक वापरा आणि याचा तुम्हाला फायदा होतो का हे आम्हाला नक्की कळवा.