scorecardresearch

Premium

Kitchen Jugaad: झोपण्याआधी गॅसवर ठेवा फक्त २ प्लॅस्टिकच्या बाटल्या; गॅस लवकर संपणारच नाही

Kitchen Jugaad Video: अचानक सिलेंडर संपला की मग तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही. एका गृहिणीने दाखवलेली ही ट्रिक.

kitchen tips in marathi how to save gas plastic bottle reuse see shocking result kitchen jugaad video viral
गॅस लवकर संपणारच नाही (फोटो: युट्युब/ Pink's Innovations वरून साभार)

Kitchen jugad:  सकाळी घाईघाईत टिफिन करताना किंवा दुपारी स्वयंपाक करताना अचानक सिलेंडर संपले की वांदे होतात. तुमच्यासोबतही असं कधी ना कधी झालं असेल. पण आता गॅस अचानक संपण्याची झंझटच नाही. गॅसवर प्लॅस्टिकच्या बाटल्या ठेवण्याचा असा चमत्कारिक फायदा तुम्हाला माहितीच नसेल. एका गृहिणीने हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

तसं गृहिणींना गॅस सिलेंडर कधी लावला, कधी संपणार याची कल्पना असते. पण काही वेळा गॅस जास्त वापरला जातो. ते पटकन लक्षात येत नाही आणि अचानक गॅस संपतो. अचानक सिलेंडर संपला की मग तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही. एका गृहिणीने दाखवलेली ही ट्रिक. गॅसवर प्लॅस्टिकच्या बाटल्या ठेवूण तुम्ही गॅसची बचत करू शकता.

apple iphone charger burning catches fire while charging video goes viral
आयफोन वापरणाऱ्यांनो चार्जिंग करताना काळजी घ्या; अन्यथा तुमच्याबरोबरही घडू शकते ‘ही’ घटना, पाहा Video
Imei number changed
चोरीच्या मोबाइल्सचे चक्क IMEI नंबर्स बदलणारी टोळी सापडली; नंबर ट्रेस का होत नाहीत याचा झाला उलगडा
how to turn off WhatsApp blue ticks
आता WhatsApp वर मेसेज वाचले तरी कुणाला कळणार नाही; हे कसे करायचे ते पाहा
New car maintenance tips
Car tips : नवीन गाडी घेतल्यावर ‘या’ चुका करू नका! वाहनाची काळजी कशी घ्यावी पाहा

प्लॅस्टिकच्या बॉटलची कमाल

आता तुम्हाला काय करायचं ते पाहूयात, दोन मध्यम आकाराच्या दोन बॉटल घ्यायच्या आहेत. या बॉटलचा पुढचा भाग कापायचा आहे, त्यानंतर उरलेला भाग घेऊन तो गॅसच्या बर्नवर उलटा ठेवायचा आहे. यामुळे कोणतीही घाण, अन्न या बर्नरमध्ये जाणार नाही. नेहमी पाहिलं असेल बर्‍याचदा बर्नर नीट पेटत नाही. बर्नरची छिद्रे ब्लॉक झालेली असतात. त्यामुळे बर्नरच्या बाजूने गॅस बाहेर पडतो. सिलेंडरमधून गॅस निघूनही बर्नर मधून तो वाया जातो. त्यामुळे गॅस लवकर संपतो. पण हा उपाय केल्याने बर्नर वरील छिद्र मोकळी होतील आणि गॅस छिद्रातूनच बाहेर पडेल. यामुळे गॅसचीही बचत होईल गॅस लवकर संपणार नाही, असा दावा या गृहिणीने केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: साबणामध्ये लावा सेफ्टी पिन्स; महिलांना होणार मोठा फायदा, पण पुरुषांनी चुकूनही…

Pink’s Innovations युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्याची मदत आपल्याला होऊ शकते, फक्त त्याचा योग्य उपयोग आपल्याला माहिती नसतो. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का हे आम्हाला कमेंट करु कळवा.

(सूचना – या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. लोकसत्ताचा याच्याशी संबंध नाही. लोकसत्ता याची हमी देत नाही.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kitchen tips in marathi how to save gas plastic bottle reuse see shocking result kitchen jugaad video viral srk

First published on: 11-09-2023 at 10:44 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×