मधुमेह हा एक असा आजार आहे जो खराब आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे विकसित होतो. मधुमेह हा एक विकार आहे ज्यामध्ये तुमच्या स्वतःच्या शरीरातील काही पेशी इतर पेशींवर शत्रू म्हणून हल्ला करतात आणि त्यांचा नाश करतात. देशात या आजाराच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे घेणे, शरीर सक्रिय ठेवणे आणि खाण्यापिण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

मधुमेहाच्या आजाराबद्दल बोलायला गेलं तर हा आजार मुळापासून नष्ट करता येत नाही, तो फक्त आटोक्यात आणता येतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये साखरेचे प्रमाण वाढले की शरीरात या आजाराची लक्षणे दिसू लागतात. लक्षणे त्वरित ओळखल्यास या आजाराचा धोका टाळता येतो. चला जाणून घेऊया रक्तातील साखर वाढल्याने शरीरात कोणते पाच बदल दिसून येतात.

( हे ही वाचा: तुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही)

पायावर उठणारे जखमेचे घाव

जेव्हा आपल्या शरीरात साखरेची पातळी जास्त असते तेव्हा त्याचा परिणाम सर्वप्रथम आपल्या पायांवर दिसून येतो. पाय दुखणे आणि त्यावर चट्टे येणे हे उच्च साखरेचे लक्षण असू शकते. तसंच रुग्णाला मधुमेह न्यूरोपॅथीचा त्रास होऊ शकतो. मधुमेहामध्ये नसांना इजा झाल्यामुळे हात आणि पायांना मुंग्या येणे, हात पाय बधीर होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. ज्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. डायबेटिक न्यूरोपॅथी हा रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळे होणारा एक आजार आहे.

डायबेटिक रेटिनोपॅथी असणे

डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे मधुमेह वाढल्याने डोळ्याच्या रेटिनाच्या रक्तवाहिन्यांना होणारे नुकसान. या समस्येमुळे डोळ्यांखाली काळे डाग दिसू लागतात. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांना भेटून डोळे तपासावेत.

( हे ही वाचा: Uric Acid: ‘या’ ४ आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही युरिक अॅसिड आणि सांधेदुखीपासून मुक्त होऊ शकता; जाणून घ्या तज्ज्ञांकडून)

कानांवर परिणाम होणे

ज्या लोकांच्या रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यांच्या कानावरही त्याचा परिणाम होतो. रक्तवाहिन्यांचे नुकसान झाल्यामुळे, कानातून कमी ऐकू येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनावर देखील परिणाम होतो

ज्या लोकांच्या रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यांच्या मेंदूवरही साखर वाढण्याचा परिणाम होतो. जसजसा मधुमेह वाढत जातो तसतसा रुग्ण नैराश्याचा बळी होतो, त्याला कोणत्याही कामात रस नसतो. मधुमेहाचा परिणाम पूर्णपणे मानसिक आरोग्यावर होतो.