Joint Pain Causes : काही लोकांना हाताच्या आणि पायांच्या हाडांमध्ये सतत वेदना जाणवतात. यामागचे नेमके कारण काय हे मात्र त्यांना समजत नाही. जर यावर वेळीच उपचार केला नाही तर ही समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते, त्यामुळे यावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्याक असते. कोणत्या कारणांमुळे हाताच्या आणि पायांच्या हाडांमध्ये वेदना होतात जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कारणांमुळे होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास

दुखापत
जर पायाला किंवा हाताला काही दुखापत झाली असेल तर तिथली हाडं दुखू लागतात. काहीवेळा फार दिवसांअगोदर झालेल्या दुखापतीमुळेदेखील सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. या दुखापतीवर योग्य उपचार न झाल्यामुळे हा त्रास पुन्हा उद्भवू शकतो.

आणखी वाचा : हिवाळ्यात केळी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

व्हायरल इन्फेकशन
व्हायरल इन्फेकशनमुळेही सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. हेपेटाइटिस सी या व्हायरसमुळे हाताच्या आणि पायांच्या हाडांमध्ये वेदना जाणवू लागतात. जर अशा वेदना सतत जाणवत असतील, तर त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यल आहे.

संधीवात
संधीवाताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना देखील सतत सांधेदुखीचा त्रास होतो. यामध्ये सांध्यांना सूज देखील येते, त्यामुळे हाडांमध्ये वेदना जाणवतात. त्यामुळे सतत होणाऱ्या सांधेदुखीचे कारण संधीवात असू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the reason behind pain in the joints of hands and feet pns
First published on: 09-11-2022 at 09:48 IST