Janmashtami Bhajans in Marathi: १८ ऑगस्टला महाराष्ट्रासह देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा होणार आहे. हिंदू धर्मीयांमध्ये श्रीकृष्ण जन्म पवित्र उत्सव मानला जातो. तिथीनुसार कृष्णाचा जन्म हा श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला मध्यरात्री झाला होता, त्यानुसार अनेक ठिकाणी रात्री १२ वाजता जन्माष्टमीचा उत्सव सुरु होतो. दिवसभर व्रत करून रात्री १२ वाजता लड्डू गोपाळाला नैवेद्य दाखवून मग अन्न ग्रहण केले जाते. अनेक घरांमध्ये यादिवशी जागरण व भजनसंध्या असे कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा तुमच्याकडेही असा सोहळा आयोजित करणार असाल तर या प्रसंगाची शोभा वाढवण्यासाठी आपण काही मंगलमय भजने, धम्माल गवळणी व मराठी गाणी आज पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही सण समारंभात जर गाणी वाजवण्याची जबाबदारी घरात तुमच्याकडेच दिली जात असेल तर ही तयार यादी तुमच्या नक्की कामी येईल. कृष्ण जन्माष्टमीला घरातील वातावरण शुभ व मंगलमय करण्यासाठी खाली दिलेली ही भजने नक्की ऐका.

१) अच्युतम केशवम


२) नंद किशोरा


३) नटखट कान्हाच्या गवळणी

४) कृष्ण जन्मला


५) श्रीकृष्ण आरती


Shri Krishna Janmashtami 2022: जन्माष्टमीला ‘या’ वस्तूंची खरेदी ठरते दुहेरी लाभ; आजच तपासून घ्या

यंदा दोन वर्षानंतर कृष्ण जन्माचा सोहळा थाटमाटात पार पडणार आहे. आपणही हा उत्साह अनुभवायला विसरू नका. कृष्ण जन्माष्टमीच्या आपल्याला खूप शुभेच्छा!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krishna janmashtami 2022 songs check here janmashtami bhajans krishna songs in marathi svs
First published on: 17-08-2022 at 15:07 IST