Shahnaz Husain Hair Tips: केस काळेशार, लांबसडक आणि सुंदर असावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आजच्या मॉर्डन युगामध्ये हेअर स्टाइलचा ट्रेंड कोणताही असो, पण प्रत्येकालाच आपले केस घनदाट आणि मऊ हवे असतात. प्रत्येत ऋतूमध्ये केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. महत्त्वाचं म्हणजे, हिवाळ्यात केसांची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. हवामान बदलानुसार आपले आरोग्य, त्वचा आणि केसांवरही परिणाम होत असतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. त्यामुळे केसं तुटू लागतात आणि केसांची चमकही कमी होत जाते.

महिलावर्गाला आपल्या केसांची चिंता अधिक असते. यासाठी बहुतांश जणी हेअर स्पा, हेअर मसाज आणि कित्येक ब्युटी पार्लर ट्रीटमेंटची मदत घेतात. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर होत असल्याने केसांचे नुकसान होते. केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही नैसर्गिक उपचार करू शकता. बदलत्या परिस्थितीनुसार आता महिलावर्ग केसांसाठी नैसर्गिक तसंच घरगुती उपाय करण्यावर भर देत असल्याचे दिसत आहे.

mango face mask for summer
उन्हाळ्यात फळांचा राजा घेईल तुमच्या थकलेल्या चेहऱ्याची काळजी! पाहा घरगुती मँगो फेस मास्क DIY
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी काळजी घ्या

तसं पाहायला गेल तर केसगळती ही एक सामान्य समस्या आहे. पण केसांची वाढच होत नसेल तर मग ही गंभीर बाब असू शकते. केस पातळ होणे, कोरडे होणे, केसगळती इत्यादी समस्यांमुळे महिलावर्ग अतिशय अस्वस्थ होतात. कारण कधीकाळी जाड, घनदाट असलेले केस अचानक खराब का होत आहेत, याचे उत्तर त्यांना सापडत नाही. या समस्येकडे तुम्ही योग्य वेळेतच लक्ष दिले तर केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. म्हणून आपण हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची यासाठी तज्ज्ञांचा सल्ला जाणून घेणार आहोत.

( आणखी वाचा : Teeth Treatment: दातांवरील उपचारानंतर ‘अशी’ घ्या काळजी; दात राहतील मोत्यासारखे चमकदार! )

शहनाज हुसेन यांनी कोरड्या केसांसाठी सांगितलेल्या खास टिप्स

शहनाज सांगतात, आवळा हा केसांसाठी फायदेशीर आहे. आवळ्याच्या केसासाठीच्या उपयुक्ततेमुळे आवळ्याला रोजच्या वापरात आणण्यासाठी आवळ्याचं तेल वापरणं फायदेशीर ठरते. आवळ्याच्या तेलामध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन ई, मिनरल्स तसेच पुरेसे अ‍ॅंटी ऑक्सिडंट असतात. आवळ्याचं तेल घरच्या घरीदेखील बनवता येऊ शकते.

आवळा आणि मेथी: १० ते १५ ग्रॅम सुका आवळा आणि एक चमचा मेथीचे दाणे घ्या. आवळा आणि मेथी दोन्ही बारीक वाटून घ्या. त्यांना १०० मिली शुद्ध खोबरेल तेल किंवा तीळ तेलात घाला. सर्व साहित्य एका काचेच्या बरणीत घट्ट फिटिंग झाकणाने ठेवा. १० दिवस दररोज उन्हात ठेवा, घटक ढवळण्यासाठी दररोज हलवा. १५ दिवसांनी स्वच्छ मलमलच्या कपड्यातून तेल गाळून काचेच्या बरणीत ठेवा. हे तेल केसांना लावण्यासाठी वापरले जाऊ शकते. हे सर्व केसांच्या समस्येसाठी तसेच डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरेल.

तिळाचे तेल आणि अंडा: कोरड्या, केसांसाठी एक चमचे तिळाचे तेल, एक चमचे शुद्ध ग्लिसरीन आणि एक अंड्यातील पिवळ बलक घ्या. एकत्र मिसळा आणि केसांना लावा. टोकांवरही लावा. लांब केसांसाठी जास्त तेल घ्या. अर्ध्या तासानंतर केस धुवा.