प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी २७ फेब्रुवारीला ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा केला जातो. वि.वा. शिरवाडकर हे मराठीतील प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि मानवतावादी होते. त्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि गरिबीसारख्या सामाजिक दुष्कृत्यांबद्दल बरेच लिखाण केले आहे. त्यांनी सोळा कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात निबंध, अठरा नाटके आणि सहा एकांकिका लिहिल्या. नुकतीच केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर मराठीजनांमध्ये समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.

मराठी साहित्याची महानता ओळखण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषेत आधुनिक इंडो-आर्यन भाषांमधील काही प्राचीन साहित्याचा समावेश आहे.

Marathi Bhasha Din 2025: मराठी भाषा दिनानिमित्त पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा आणि संदेश

१९९९ मध्ये कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारने ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी सरकारकडून दोन विशेष पुरस्कारही सुरू करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी भाषा दिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील शाळा आणि इतर संस्थांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाते. तथापि, गेले दोन वर्षांपासून सुरु असलेल्या करोना महामारीच्या काळात यामध्ये खंड पडला आहे.