How To Grow Lemon Plant at Home: तुमच्या अंगणात किंवा गच्चीवर लावलेलं लिंबाचं रोप बहरत नाही? पानं भरभरून येत असली तरी ना फुलं येतायत ना फळं? मग थांबा… ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. लिंबू हे असं झाड आहे की, थोडीशी योग्य काळजी घेतली, तर ते भरपूर फळं देऊ लागतं. पण बऱ्याच वेळा असं होतं की, झाडाची वाढ उत्तम होते; पण त्याला फुलं किंवा फळं येत नाहीत. त्यामागे मातीतील पोषण घटकांची कमतरता हे कारण असतं. पण आता काळजीचं काही कारण नाही. एक खास नैसर्गिक घटक आहे, जो तुम्ही झाडाच्या मुळाजवळ फक्त ‘चुटकीभर’ घातला, की काही आठवड्यांतच झाड फुलांनी आणि फळांनी लगडलेलं दिसेल. हा चमत्कारी घटक कोणता आहे ते आपण जाणून घेऊया…
तुमच्या बागेतील लिंबाच्या रोपाची कितीही काळजी घेतली तरी त्यावर न फुलं येतात ना फळं? असं का होतं? झाडं तर टवटवीत दिसतात; पण त्यांना फळं लागत नाहीत… यामागचं खरं कारण काय? आणि या एकाच घटकाचं चिमूटभर मिश्रण टाकल्यावर इतका मोठा परिणाम कसा साधला जातो? याबाबतची माहिती वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
ह्युमिक अॅसिड म्हणजे नेमकं काय?
ह्युमिक ऍसिड हे नैसर्गिक जैविक द्रव्य आहे. ह्युमिक अॅसिड एक नैसर्गिकरीत्या तयार होणारं सेंद्रिय संयुग आहे, जे माती, कंपोस्ट आणि इतर कुजलेल्या वनस्पती पदार्थांमध्ये आढळतं. हे संयुग वनस्पतींची वाढ आणि मातीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाचं आहे. ते मातीचं आरोग्य सुधारतं आणि झाडांच्या मुळांची वाढ उत्तम करतं. त्याच्या वापरामुळे मातीतील सूक्ष्मजीव क्रियाशील होतात आणि झाडांना आवश्यक पोषण सहज मिळू लागतं.
कसा कराल वापर?
- एका लिटर पाण्यात एक चुटकी ह्युमिकअॅसिड घालून चांगलं ढवळा.
- झाडाच्या मुळांजवळ असलेल्या मातीत हे द्रावण टाका.
- हा उपाय महिन्यातून एकदाच करा.
- आधी थोडीशी गुड़ाई (म्हणजे मातीची हलकी खणखण) केल्यास फायदा दुप्पट!
फायदेच फायदे!
- फुलं आणि फळांची संख्या झपाट्याने वाढते.
- पानं हिरवीगार आणि ताजीतवानी होतात.
- झाडं रोगांपासून सुरक्षित राहतात.
- माती होते अधिक उपजाऊ. कारण- त्यात केंचुए आणि फायदेशीर जीवाणू वाढतात.
काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:
- ह्युमिक अॅसिड जास्त प्रमाणात वापरू नका
- दर महिन्याला फक्त एकदाच
- झाडाला पुरेसं ऊन आणि पाणी मिळालं पाहिजे
तुम्हालाही लिंबाच्या झाडावर टवटवीत फळं पाहायची असतील, तर या उपायाला आजच सुरुवात करा. दोन महिन्यांतच बदल डोळ्यांसमोर दिसेल आणि तुमचं झाड होईल फळांनी लगडलेलं म्हणजे अगदी बहरलेलं दिसेल.