LIC Jeevan Amar Plan Full Details in Marathi : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) नवीन इन्शुरन्स प्लान(वीमा योजना) लाँच केला आहे. या ऑनलाइन वीमा योजनेचं नाव जीवन अमर असे आहे. या पॉलिसीमध्ये अनेक नवीन आणि आकर्षक फीचर्स जोडले आहेत. जाणून घेऊयात जीवन अमर योजनेबद्दल….

पॉलिसीमध्ये काय आहे खास? :

– जीवन अमर वीमा योजना घेण्यासाठी १८ वर्ष पूर्ण असावे ही अट आहे. आकस्मिक मृत्यूनंतर कुटुंबीयांना मिळणारा फायदा दोन प्रकारे निवडू शकता. लेव्हल सम एश्योर्ड आणि इन्क्रीज सम एश्योर्ड पॉलिसी प्लान असणार आहे. लेव्हल सम एश्योर्डमध्ये पॉलिसीधारकांना जेवढ्याचा प्लान घेतलाय तेवढीच रक्कम राहणार आहे. तर इन्क्रीज सम एश्योर्डमध्ये सुरूवातीचे पाच वर्षे तीच रक्कम राहणार आहे. त्यानंतर सहाव्या वर्षांपासून दहाव्या वर्षापर्यंत प्रति वर्ष दहा टक्के रक्कमेचा फायदा होणार आहे.

– सिगारेट न पिणाऱ्यांसाठी या योजनेमध्ये कमी दर ठेवण्यात आले आहेत. तर महिलांसाठी स्पेशल इंट्रेस रेट्स ठरवण्यात आले आहेत. या योजनेसह वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंत कव्हरेज सुरक्षा मिळणार आहे.

– या योजनेचा प्रीमियम भरण्यासाठी विशिष्ट कालावधी तुम्ही निवडू शकता. तसेच एकरकमी किंवा ठरावीक कालावधीत भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

– सामान्य आणि नियमित स्वरूपाच्या प्रीमियम पॉलिसीमध्ये अपघात रायडर वीमा उपलबद्ध आहे. या प्रकारचे विमाछत्र प्रत्येक कमावत्या व्यक्तीजवळ असणे अतिशय आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे फार कमी लोकांना याच्या गांभीर्याची कल्पना असते.

– या पॉलिसीनुसार कमीतकमी बेसिक सम इंश्योरर्ड (बीएसए) 25 लाख आहे. आणि जास्तीत जास्तची कोणतीही मर्यादा नाही. पॉलिसीधारकाच्या वयावरही पॉलिसीची रक्कम निर्भर करते.

– डेथ बेनेफिट (मृत्युनंतर कुटुंबीयांना)मध्ये रकम एकत्र किंवा हप्त्यामध्येही भरू शकता. जीवन अमर विम्याच्या पॉलिसीमध्ये अपघाती मृत्यूच्या संभावनेमध्ये विमाछत्राची रक्कम त्या व्यक्तीच्या वारसाला दिली जाते

– तज्ज्ञांच्या मते, या पॉलिसीमध्ये सम अश्योर्ड जितका जास्त असेल, प्रीमियम तेवढाच कमी होत जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूचना : जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्याची किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.