मित्रांनो आताच्या वेळेत प्रत्येक व्यक्ती आपल्या जोडीदाराला वेगवेगळ्या नावाने हाक मारतात याच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनसाथी किंवा लव पार्टनर चा नंबर मोबाईल मध्ये वेगळ्या नावाने सेव करतो. जसे लाइफलाइन, लवलाइन अशामध्ये तुम्ही तुमच्या जीवनसाथीला तिच्या नावा साठी सोलमेट शब्द सुद्धा वापरू शकतात.

सोलमेट म्हणजे असा व्यक्ती जो प्रत्येक स्थितीमध्ये प्रत्येक वेळी तुमच्या सोबत असतो आणि प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला साथ देतो त्यालाच सोलमेट असे म्हणतात. सोलमेट हे खूप चांगले नाव आहे सोलमेटचा मराठीत अर्थ जोडीदार जीवापेक्षा प्रिय असा होतो. असा व्यक्ती ज्याच्यासोबत तुमचे नाते खूप चांगले आणि पक्के आहे. तो तुमचा जीवनसाथी पती किंवा पत्नी किंवा तुमचा जवळील मित्र कोणीही व्यक्ती असू शकतो. अधिक तर या शब्दाचा वापर आपल्या जोडीदारासाठी केला जातो.

सोलमेट तुमच्यासोबत कोणत्याही नात्यात असू शकतो. तर फक्त एक चांगला मित्रच सोलमेट असू शकतो का? यातला फरक जाणून घेऊया

सोलमेट आणि बेस्ट फ्रेंडमध्ये काय फरक आहे?

दोन बेस्ट फ्रेंड्समध्ये नेहमीच ही अट असते की जर तुम्हाला मी आवडत नसेल तर तुम्ही मला सोडून जाऊ शकता, तर सोलमेट सोबत तुम्ही समस्या किंवा मतभेद असूनही घनिष्ठपणे जोडलेले राहतात आणि तुमच्यामध्ये संबंध तुटण्यासारखी परिस्थिती कधीच येत नाही.

खरा मित्र तुम्हाला दोषांसह स्वीकारतो आणि विश्वास ठेवतो की तुम्ही जसे आहात तसे तुम्ही त्याचे चांगले मित्र आहात. तर सोलमेट तुमच्या चुका दूर करण्याचा, तुमचे व्यक्तिमत्वाचा विकार करण्याचा आणि तुम्हाला अधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करत राहतो.

एखाद्याचा खरा मित्र होण्यासाठी काही महिने आणि वर्षे लागतात, तुम्ही पहिल्यांदा एकत्र वेळ घालवता आणि कालांतराने तुमची मैत्री अधिक घट्ट होते. तर सोलमेटसोबत तुमचं नात आपोआप तयार होतं, त्याचा सहवास तुम्हाला हवाहवासा वाटू लागतो. हे नाते इतके खोल आहे की त्याशिवाय कोणतेही काम पूर्ण होणे अशक्य वाटते. सोलमेट तुम्हाला तुमच्यापेक्षा, तुमच्या चुका, तुमच्यातील कमतरता अधिक जाणतो. तसेच तुम्हाला प्रेरणा देण्याचा मार्ग आणि तुमची ताकद ओळखतो. तर मित्र भूतकाळातील घटनांच्या आधारे तुम्हाला ओळखत असता.

हेही वाचा – ‘या’ गोष्टींमुळे तुटू शकते लग्न; जाणून घ्या घटस्फोटाची सर्वांत जास्त कारणे

सोलमेट हे फक्त तुमचे मित्र किंवा प्रेमी नसतात, ते तुम्हाला जीवनातील काही धडे शिकवण्यासाठी आणि तुम्हाला पुढे जाण्यात किंवा काहीतरी महत्त्वाचे शिकण्यास मदत करण्यासाठी तुमच्या आयष्यात येतात. सोलमेट हा आरशासारखा असतो जो आपल्याला आपल्यातले चांगले पाहण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात सोलमेट आणि बेस्ट फ्रेंड यांची वेगवेगळी भूमीका असते.