Lip Cancer Symptoms: ओठांचा कॅन्सर बहुतेक वेळा उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे होतो. तो वेळेत ओळखला नाही तर धोकादायक ठरू शकतो. ओठांचा कॅन्सर तेव्हा होतो, जेव्हा पेशी अनियमितपणे वाढतात आणि ओठावर गाठी किंवा जखमा तयार होतात.

HT Lifestyle ला दिलेल्या मुलाखतीत मुंबईच्या सैफी हॉस्पिटलमधील कन्सल्टंट ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. मोहम्मद मिठी यांनी सांगितले की, “बहुतेक ओठांचा कॅन्सर हा उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे होतो. पण, तंबाखू चघळणे, पाईपमधून तंबाखू ओढणे, धूम्रपान, जुने दातांचे आजार आणि दारू पिणे यामुळेही ओठांचा कॅन्सर होऊ शकतो.”

सूर्यकिरणांच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्याने ओठांचा कॅन्सर का होतो? (Lip Cancer Reason)

डॉ. मोहम्मद मिठी यांनी सांगितले, “सूर्याच्या किरणांचा, विशेषतः अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांचा जास्त संपर्क झाल्याने त्वचेतील पेशींचे DNA खराब होते. त्यामुळे बदल (म्युटेशन) होतात आणि कॅन्सर होऊ शकतो. खालचा ओठ जास्त उन्हात उघडा राहतो म्हणून तो जास्त धोक्यात असतो. जे लोक बाहेर जास्त वेळ घालवतात आणि ज्यांनी SPF असलेला लिप बाम किंवा इतर संरक्षणाची साधने वापरलेली नाहीत, त्यांना हा धोका अधिक असतो.”

ओठांच्या कॅन्सरची लवकर दिसणारी लक्षणे (Lip Cancer Symptoms)

ऑन्कॉलॉजिस्ट यांनी सांगितले, “सुरुवातीला ओठांवर एक गाठ किंवा जखम दिसू शकते जी दुखत नाही, पण नंतर जखम खोल होऊ शकते. कधी कधी लहानशी जखम दिसते, ज्यामध्ये मांस जास्त वाढलेले नसते. काही वेळा ओठावर गाठ किंवा जाडसर भाग दिसतो. ओठावर पांढरे किंवा लाल डाग दिसू शकतात. सुरुवातीला वेदना आणि सुन्नपणा जाणवत नसेल म्हणून ते होण्याची वाट पाहू नका, ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.”

ओठांचा कॅन्सर रोखण्यासाठी टिप्स (Lip Cancer Prevention Tips)

सूर्यापासून संरक्षण करणे, तंबाखू आणि दारू टाळणे, नियमित तपासणी करणे आणि पौष्टिक आहार घेणे या गोष्टींचा अवलंब केल्याने ओठांचा कॅन्सर टाळता येऊ शकतो.

जीवनशैलीत बदल: ओठांचा कॅन्सर टाळण्यासाठी सूर्याच्या संपर्कात कमी वेळ राहणे, वाईट सवयी सोडणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे.