Best Fruit for Liver Cancer Prevention: आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत शरीराला निरोगी ठेवणं सोपं नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या धावपळीमध्ये अनेकदा आपण आपल्या आरोग्याकडे पाहिजे तसे लक्ष देत नाही.आहार आणि जीवनशैलीवर योग्य तसे लक्ष देत नाही. अशा परिस्थितीत नैसर्गिक उपाय आणि फळे-भाज्या आपल्या शरीराला हळूहळू पोषण देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान जितके प्रगती करीत आहे, तितकंच नैसर्गिक घटकांमधील अदभुत गुणधर्म उलगडण्याचा प्रयत्नही होत आहे.

अलीकडील संशोधनातून तज्ज्ञांनी एक मोठा शोध लावला आहे. अनेक लोकांसाठी धोकादायक असणारा यकृताचा कर्करोग (Liver Cancer), जो सुरुवातीला आपल्या शरीरावर गुपचूप विपरीत परिणाम करतो आणि लक्षणे दिसेपर्यंत गंभीर अवस्थेत पोहोचतो. परंतु, त्यावर नैसर्गिक उपायांचा प्रभाव लक्षात आला आहे. यातील एका शक्तिशाली फळाच्या घटकांमध्ये कर्करोगाशी लढण्याची शक्ती आहे, जी आपल्या शरीराला हळूहळू संरक्षित ठेवू शकते.

तज्ज्ञांच्या मते, या घटकांचा शोध घेऊन संशोधनात असे संकेत आढळले आहेत की, नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि विशिष्ट अणू शरीरातील हानिकारक पेशींवर प्रभाव टाकतात, ज्यामुळे यकृताचे संरक्षण होते. हे फळ आज आपल्या आहारात सहज समाविष्ट करता येते आणि त्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला फक्त पोषण मिळत नाही, तर कर्करोग प्रतिबंधक गुणधर्मही लाभतात.

यकृताचा कर्करोग जगभरातील लोकांसाठी चिंता निर्माण करणारा आजार आहे. अनेक वेळा तो सुरुवातीला लक्षणरहित असतो, त्यामुळे वेळेवर उपाय न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नैसर्गिक उपचार आणि पोषणयुक्त आहाराचे महत्त्व वाढते. संशोधनात सापडलेल्या या अदभुत घटकांबद्दल जाणून घेणं आणि योग्य आहारावर भर देणं आजच्या जीवनशैलीत फार गरजेचं आहे.

यकृताचा कर्करोगाशी लढण्यासाठी सर्वांत आश्चर्यकारक नैसर्गिक घटक म्हणजे पेरू. त्यातील शक्तिशाली अणू शरीराला कर्करोगापासून संरक्षण देऊ शकतात. पेरू हे फळ व्हिटॅमिन सी आणि डाएटरी फायबरने भरपूर आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पचन सुधारते आणि शरीराला निरोगी ठेवते. पण, आता तज्ज्ञांनी शोधलंय की, यामध्ये आणखी एक ‘अतीव शक्ती’ दडलेली आहे आणि ती म्हणजे हे फळ लिव्हर कॅन्सरपासून संरक्षण देऊ शकतं.

तज्ज्ञांचा शोध

डेलावेअर विद्यापीठातील संशोधकांनी पेरूतील कर्करोगाशी लढणारे अणु (molecules) तयार करण्याचा नवीन मार्ग शोधला आहे. William Chain, असोसिएट प्रोफेसर आणि त्यांच्या संशोधन प्रयोगशाळेने या अणूंची सिंथेसिस (Natural Product Total Synthesis) करून, एक सोपा आणि कमी खर्चीक उपाय शोधला.

संशोधनानुसार, ही पद्धत सर्वसामान्य रासायनिक घटकांचा वापर करून पेरूतील अणू तयार करण्याची क्षमता शोधते. त्यामुळे कर्करोगावरील उपचार अधिक किफायतशीर आणि प्रभावी होऊ शकतात.

चेन म्हणतात,“जास्तीत जास्त औषधे नैसर्गिक स्रोतांवर आधारित आहेत; पण पुरेशी नैसर्गिक साधने नाहीत. आता रसायनतज्ज्ञ या ‘रेसिपी’चा वापर करून स्वतंत्रपणे अणू तयार करू शकतात.”

यकृताचा कर्करोग म्हणजे काय?

यकृताचा कर्करोग म्हणजे काय? म्हणजे यकृताच्या पेशींमध्ये होणारा कर्करोग. सर्वसाधारण प्रकार हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा असतो.

सामान्य लक्षणे:

  • पोटाच्या वरच्या भागात वेदना
  • उलट्या व मळमळ
  • पोट फुगणे
  • त्वचेचा पिवळटसर रंग
  • भूक कमी होणे आणि वजन कमी होणे

जागतिक पातळीवर १२५ पैकी एका व्यक्तीला जीवनात एकदा तरी यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

पेरूची अदभुत सुपर पॉवर

संशोधनानुसार, पेरूतील नैसर्गिक अणू लिव्हर यकृताच्या पेशींवर परिणाम करतात. या अणूंच्या कमी खर्चीक संश्लेषण पद्धतीमुळे जगभरातील तज्ज्ञ हे अणू तयार करून उपचार अधिक प्रभावी करू शकतात.

म्हणूनच रोजच्या आहारात पेरूचा समावेश केल्यास फक्त शरीरासाठी पोषण नाही, तर कर्करोगविरोधी गुणधर्मदेखील मिळतात. नैसर्गिक, साधा वाटणारा, पण प्रभावी असलेला पेरू आपल्या आरोग्यासाठी खरंच एक ‘सुपरफ्रूट’ ठरू शकतं.