Liver Disease Symptoms: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपली खाण्यापिण्याची सवय आणि संपूर्ण दिनचर्या बदलली आहे, याचा थेट परिणाम आपल्या शरीराच्या अवयवांवर होत आहे. चुकीच्या आहार आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे लिव्हरशी संबंधित समस्या खूप सामान्य झाली आहे. लिव्हर हे शरीरातील अतिशय महत्त्वाचे अवयवांपैकी एक आहे. लिव्हर रक्त शुद्ध करण्याचे, विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे आणि पोषणद्रव्यांना ऊर्जामध्ये बदलण्याचे काम करते.

पण, जेव्हा लिव्हरमध्ये समस्या निर्माण होते तेव्हा त्याची लक्षणे चेहऱ्यावर दिसायला लागतात. या लक्षणांची वेळेत ओळख होणं खूप गरजेचं आहे. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वैशाली येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे संचालक डॉ. पी. कर यांनी लिव्हरच्या समस्यांमध्ये चेहऱ्यावर दिसणारी लक्षणं आणि त्यापासून बचाव कसा करायचा हे सांगितले आहे.

चेहरा आणि डोळ्यांमध्ये पिवळसरपणा (Liver Damage Symptoms)

चेहरा आणि डोळ्यांमध्ये पिवळसरपणा दिसायला लागला, तर तो दुर्लक्ष करू नये. चेहऱ्याची त्वचा थोडी पिवळी वाटू लागली आणि डोळ्यांतील पांढरट भागही पिवळा दिसू लागला तर ही लिव्हरची समस्या असू शकते. हे पिवळ्या रोगाचं लक्षण असू शकतं. जेव्हा लिव्हर बिलीरुबिन नावाचं द्रव्य नीट प्रोसेस करू शकत नाही, तेव्हा ते रक्तात साचायला लागतं आणि त्यामुळे शरीरात पिवळसरपणा दिसायला लागतो.

चेहऱ्यावर मुरुमं किंवा लाल चट्टे (रॅशेस)

जेव्हा लिव्हर नीट काम करत नाही, तेव्हा शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर जाऊ शकत नाहीत. कारण लिव्हर हे टॉक्सिन्स शरीराबाहेर काढण्याचं काम करतं. पण, लिव्हर ठीक काम करत नसेल तर हे टॉक्सिन्स शरीरात साचायला लागतात आणि त्यामुळे त्वचेवर रॅशेस, मुरुमं किंवा खाज येऊ लागते. वारंवार मुरुमं होणं हे लिव्हर बिघडल्याचं लक्षण असू शकतं.

चेहऱ्यावर सूज (Liver Damage Signs)

लिव्हरची समस्या असल्यास चेहऱ्यावर सूज दिसू शकते. लिव्हरमध्ये सूज आल्यावर चेहऱ्यावर, खासकरून डोळ्यांखाली सूज दिसू लागते. याशिवाय चेहरा फुगलेला आणि थकलेला वाटायला लागला, तर तो लिव्हरमध्ये सूज म्हणजेच फॅटी लिव्हर डिसीजचं लक्षण असू शकतं.

ओठांचा रंग बदलणे (Liver Health Problems)

ओठांचा आणि जिभेचा रंग गडद किंवा निळसर दिसायला लागला तर समजावं की लिव्हरमध्ये काहीतरी बिघाड होत आहे. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. हे लिव्हरच्या कार्यात अडथळा येत असल्याचं लक्षण असू शकतं. यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोळ्याखाली काळसरपणा (डार्क सर्कल्स)

लिव्हर कमजोर झाल्यावर शरीरात ऊर्जा तयार होण्याची प्रक्रिया प्रभावित होते. यामुळे चेहऱ्यावर थकवा, डोळ्याखाली काळसरपणा (डार्क सर्कल्स) आणि त्वचा निस्तेज दिसू लागते.

यापासून बचाव कसा करावा

  • संतुलित आहार: हिरव्या भाज्या, फळं, हळद, आवळा आणि बीटरूटसारख्या गोष्टी लिव्हर शुद्ध (डिटॉक्स) करण्यास मदत करतात.
  • दारू आणि तेलकट अन्नापासून दूर राहा.
  • दिवसभरात किमान २-३ लिटर पाणी प्या, म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर जाऊ शकतील.
  • कपालभाति, अनुलोम-विलोम यांसारखे प्राणायाम लिव्हर स्वस्थ ठेवण्यासाठी उपयुक्त असतात.