पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र राज्य, यांच्या सहकार्याने आणि होरायझन्स सेंटर फॉर कल्चरल स्टडीजने ‘दुर्ग-शास्त्र, स्थापत्य आणि मीमांसा’ या ऑनलाइन अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे. हा ७२ तासांचा, तीन महिने कालावधीचा, ऑनलाईन, ई-प्रमाणपत्र अभ्यासक्रम दि. ४ जुलैपासून, गुरुपौर्णिमेपासून, सुरू होत असून दर शनिवारी व रविवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. आपल्या हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात दुर्ग आहेत. या खंडप्राय देशाची भौगोलिक विषमता अतर्क्य मानावी अशीच आहे अन् त्या विषमतेला साजेल अशाच अप्रतिम दुर्गांच्या श्रेणी आपल्या देशामध्ये आहेत…

किंबहुना आपल्या भौगोलिक व प्रादेशिक वैशिष्ट्यांच्याच आधारावर येथल्या भाष्यकारांनी, स्मृतिकारांनी, शास्त्रकारांनी निरनिराळ्या दुर्गांची वैशिष्ट्ये सांगितली व बहुधा त्यानुसार शिल्पशास्त्रींनी प्रत्यक्ष रचना साकारली किंवा शिल्पींनी रचलेल्या दुर्गांच्या अनुरोधाने शास्त्रकारांनी दुर्गवैशिष्ट्यांचा उहापोह केला…

मराठीतल्या मोठ्या अभ्यासक्रमाची लहान इंग्रजी आवृत्तीही काढण्यात येत आहे. हा एक महिना कालावधीचा, इंग्रजी भाषेतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. अधिक माहितीसाठी डॉ. मिलिंद पराडकर यांच्याशी 9619006347 / discover.horizon@gmail.com संपर्क साधावा.