Maharashtra Din 2022: भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता आणि भारतातील अनेक राज्य सारखीच होती. पण हळूहळू ही राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर विभागली गेली आणि अशा प्रकारे भारतातील अनेक नवीन राज्य निर्माण झाली. भारतातील जवळजवळ सर्व राज्य दरवर्षी त्यांच्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करतात आणि त्याच प्रकारे, महाराष्ट्रातही, दरवर्षी मे महिन्यात स्थापना दिवस १ मे (1 may) रोजी साजरा केला जातो.

कोणत्या साली झाली सुरुवात?

Maharashtra Day Date: दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्रातील लोक त्यांच्या राज्यात महाराष्ट्र दिन साजरा करतात. या दिवशी १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हे राज्य भारत देशाचे राज्य म्हणून ओळखले गेले. तेव्हापासून महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जात होता. या दिवशी राज्यातील शाळा, विद्यापीठे आणि सरकारी कार्यालयांना या राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते. वेगेवेगळ्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जात.

महाराष्ट्र हे वेगळे राज्य कसं झालं?

History of Maharashtra: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर बहुतांश प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याचवेळी या भाषेच्या आधारे वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषेतील लोकांना स्वतःचे वेगळे राज्य हवे होते. त्याचवेळी मराठी भाषा बोलणारे लोक स्वत:साठी वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी करत होते. या दरम्यान देशात अनेक आंदोलनेही झाली आणि या चळवळींचा परिणाम म्हणून १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. म्हणजेच महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य हे पूर्वी एकच राज्य म्हणून ओळखले जात होते.

वास्तविक अनेक राज्य “राज्य पुनर्रचना कायदा” १९५६ अंतर्गत निर्माण झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले. तेलुगू भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. त्याच वेळी मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमिळ भाषेच्या लोकांना तामिळनाडू राज्य मिळाले. पण मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही. त्यानंतर या लोकांनी स्वत:साठी स्वतंत्र राज्याची मागणी करत अनेक आंदोलनं सुरू केली.

(हे ही वाचा: Maharashtra Day 2022: महाराष्ट्र दिनानिमित्ताने आपल्या प्रियजनांना पाठवण्यासाठी खास शुभेच्छा मेसेज)

१९६० मध्ये जिथे एका बाजूला गुजरात राज्य निर्माण करण्यासाठी महागुजरात चळवळ सुरू झाली. त्याचवेळी महाराष्ट्र राज्याच्या मागणीसह संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. १ मे १९६० रोजी भारताच्या विद्यमान सरकारने बॉम्बे राज्याचे दोन राज्यांमध्ये विभाजन केले. मराठी भाषिक लोकसंख्येसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि गुजराती भाषिक लोकसंख्येसाठी गुजरात राज्याची निर्मिती झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईवरून सुरु झाला वाद

पण त्याच दरम्यान या दोन राज्यांमध्ये मुंबईवरून भांडण सुरू झाले. जिथे महाराष्ट्र राज्यातील लोकांना मुंबई हा त्यांच्या राज्याचा भाग हवा होता, कारण तेथील बहुतांश लोक मराठी बोलत होते. त्याचवेळी मुंबईच्या प्रगतीत आपला जास्त हात असल्याचे गुजराती लोक म्हणाले. त्यामुळे तो त्यांच्या राज्याचा भाग असावा असं त्यांना वाटत होत. पण शेवटी मुंबई हे महाराष्ट्राचा भाग बनलं.त्याच वेळी, जेव्हा भारत सरकारने गोवा राज्य पोर्तुगीजांपासून स्वतंत्र केले तेव्हा महाराष्ट्र राज्याला आपल्या राज्याचा एक भाग बनवायचा होता. परंतु गोव्यातील जनतेने स्वत:साठी स्वतंत्र राज्याची मागणी केली आणि त्यामुळे गोवा महाराष्ट्र राज्यात सामील होऊ शकला नाही.