मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी. भोगी हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण आहे. हा सण जानेवारीत मध्यान्हात येतो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा! भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी घर तसेच घरा सभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे म्हणतात. सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण “पोंगल” व आसाम मध्ये “भोगली बिहू” ,पंजाब मध्ये “लोहिरी “, राजस्थान मध्ये “उत्तरावन” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगिकारल्या जातात.

(आणखी वाचा : Makar Sankranti २०२० : जाणून घ्या.. मकरसंक्रांतीचा मुहूर्त, पूजेचा विधी आणि सणाचे महत्त्व )

या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडाबहुत फरक असतो. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजीही तिळाचा कूट घालून केली जाते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makar sankranti 2020 importance of bhogi nck
First published on: 09-01-2020 at 13:36 IST