वाढत्या महगाईच्या काळात अनेक जण आवश्यक भाज्यां आपल्या घरीच रोप लावतात. अनेकांना आपल्या घरच्या बागेत विविध रोप लावतात आणि सुंदर बाग फुलवतात. रोपांच्या चांगल्या वाढीसाठी आणि सुंदर बागेसाठी अनेकदा विविध प्रकारचे खत वापरले जातात. बाजारात अनेक प्रकारचे खत मिळतात पण झाडांसाठी आवश्यक हे खत तुम्ही घरच्या घरी नैसर्गिकरित्या देखील तयार करू शकता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये नैसर्गिकरित्या घरच्या घरी खत कसे तयार करावे हे सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊ या

इंस्टाग्रामवर बाग बगीचा नावाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. स्वयंपाकघरातील भाजीपाला, फळांच्या साली वापरून खत कसे तयार करायचे हे सांगितले आहे.

हेही वाचा – आवळ्याचे फायदे माहित असूनही आहारात समाविष्ट करत नाही का? मग, आवळ्याचे हे सहज तयार होणारे पदार्थ खा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१) सर्वप्रथम भाजीपाला, फळांच्या साली असा ओला कचरा घ्या.
२) त्यानंतर त्याची छोटे छोटे काप करून घ्या.
३) त्यानंतर एका कुंडीत अथवा भांड्यात माती घ्या अथवा बागेत मातीचा खड्ड्यामध्ये माती टाका.
४) त्या मातीत भाज्या आणि फळांच्या साली असा ओला कचरा टाका.
५) त्यात दही अथवा ताक टाका, माती खालीवर करा
६) २ महिने ते तसेच राहू द्या
७) २ महिन्यांनी चांगले खत तयार होईल
८) ही माती चाळून खत वेगळे करा आणि घरच्या रोपांना हे खत वापरा
९) चाळून बाजूला राहिलेले मोठे तुकडे पुन्हा खत तयार करताना वापरा.