Eggless Mayonnaise Recipe: सध्या प्रत्येक खाद्यपदार्थांमध्ये मेयोनीजचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मेयोनीज खूप आवडीने खाल्ले जाते. मेयोनीजची चव देखील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडते. सँडविच असो किंवा बर्गर, पास्ता-मॅकरोनी किंवा सॅलड, या सर्व काहींची चव मेयोनीजने वाढवता येते. बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे मेयोनीज उपलब्ध असतात. तसंच एग्लेस मेयोनीज देखील बाजारात मिळतात. मात्र, बरेच लोक बाजारात उपलब्ध असलेले मेयोनीज खायला टाळतात कारण त्यांना वाटते की त्यात अंडी आहेत. जरी हे एग्लेस मेयोनीजच्या नावाने बाजारात उपलब्ध असले, तरीही काहींना त्याची शाश्वता नसते. म्हणून आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी अंड्याशिवाय मेयोनीज कसे बनवायचे ते सांगणार आहोत. विशेष म्हणजे ते बनवण्यासाठी कोणत्याही विशेष पदार्थांची आवश्यकता लागणार नाही तसंच जास्त वेळही लागणार नाही. एग्लेस मेयोनीजच्या या सोप्या रेसिपीबद्दल जाणून घेऊया.

एग्लेस मेयोनीजसाठी लागणारे साहित्य

  • १ कप क्रीम
  • १/४ कप तेल
  • २ चमचे व्हिनेगर
  • १/४काळी मिरी
  • अर्धा चमचा मोहरी पावडर
  • १ चमचा पिठी साखर
  • अर्धा चमचा मीठ

( हे ही वाचा:रात्री उरलेल्या चपातीपासून मुलांसाठी बनवा देसी पिझ्झा; जाणून घ्या बनवायचा कसा)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एग्लेस मेयोनीज कसे बनवायचे ?

एग्लेस मेयोनीज बनविण्यासाठी सर्व प्रथम कोल्ड क्रीम घ्या आणि मिक्सर जारमध्ये टाका. आता त्यात पिठीसाखर, तेल, मीठ, मोहरी पावडर आणि ठेचलेली काळी मिरी घालून बारीक करा. जेव्हा हे मिश्रण जाड किंवा घट्ट दिसू लागेलं तेव्हा मिक्सर चालवणे थांबवा. आता त्यात व्हिनेगर टाकून परत एकदा ढवळा. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता. अशाप्रकारे एग्लेस मेयोनीज तयार आहे. आता हे मेयोनीज मिक्सर जार मधून काढून हवाबंद डब्यात ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा.