Leftover Chapati Pizza Recipe: बर्‍याचदा रात्री केलेल्या चपात्या राहून जातात, त्यानंतर या चपात्यांचे काय करायचे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. या उरलेल्या चपात्या थंड आणि कोरड्या झाल्यामुळे कोणालाच खायला आवडत नाही. मात्र, या चपात्यांच्या मदतीने तुम्ही एक जबरदस्त रेसिपी करून पाहू शकता. ज्यामुळे तुमच्या चपात्यांची देखील नासाडी होणार नाही, आणि ही रेसिपी तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल. लहान मुलांना पिझ्झा खूप आवडतो, त्यामुळे उरलेल्या चपातीच्या मदतीने तुम्ही चविष्ट पिझ्झा बनवू शकता. हे बनवण्यासाठी तुम्हाला खूप कमी साहित्यांची आवश्यकता आहे आणि ही चवदार डिश खूप लवकर देखील तयार होते. तर जाणून घ्या देसी पिझ्झा बनविण्याची रेसिपी.

साहित्य

  • उरलेली चपाती
  • एक चमचा तेल
  • एक कप किसलेले मोझरेला चीज
  • एक टेबलस्पून पिझ्झा सॉस
  • अर्धा कांदा
  • अर्धी शिमला मिरची
  • अर्धा टोमॅटो
  • अर्धा कप उकडलेले कॉर्न
  • ओरेगॅनो
  • चिली फ्लेक्स

(हे ही वाचा: Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा Banana Pancake; रेसिपी आहे एकदम सोपी)

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

कसे बनवाल?

देसी पिझ्झा बनविण्यासाठी सर्वात आधी सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर या भाज्या उभ्या कापून घ्या. आता उरलेली चपाती घ्या आणि त्याचे थर चांगले उघडा. चपातीमध्ये किसलेले चीज भरा आणि नंतर झाकून ठेवा. आता चपातीच्यावर पिझ्झा सॉस आणि चीज पसरवा. नंतर सर्व कापलेल्या भाज्या चपातीवर व्यवस्थित ठेवा. त्यानंतर वरून थोडं चीज घाला. आता कढई गरम करून त्यावर तेल किंवा बटर लावा.आता हा चपाती पिझ्झा पॅनमध्ये ठेवा आणि वरून झाकून घ्या.४ ते ५ मिनिटांनी झाकण काढून रोटी पिझ्झाचे चार तुकडे करा आणि मग त्यात ओरेगॅनो-चिलीफ्लेक्स घालून सर्व्ह करा.