How to meditate : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात घर, ऑफिस आणि अनेक लहान मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडताना तणाव येतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
जर तुम्ही नियमित ध्यान केले तर याचा सकारात्मक परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दिसून येऊ शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, ध्यान कसे करावे? आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

ध्यान कसे करावे?

  • ध्यान करताना शांत जागा निवडावी. शांत ठिकाणी तुमचे मन स्थिर राहील आणि तुम्ही शांतपणे ध्यान करू शकाल.
  • सुरुवातीला डोळे बंद करावे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करावे. त्यानंतर दीर्घ श्वास घ्यावा. दीर्घ श्वास घेतल्यामुळे तणाव आपोआप कमी होतो.

हेही वाचा : Personality Traits : स्मार्ट लोकांना असतात ‘या’ पाच सवयी? तुम्ही हुशार आहात का? जाणून घ्या, कसे असते यांचे व्यक्तिमत्त्व…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • ध्यान करताना निवांत बसावे आणि ज्या कपड्यांमध्ये तुम्हाला आरामदायक वाटत असेल ते कपडे घालावे. यामुळे ध्यान करताना तुमचे मन आणखी स्थिर राहील.
  • ध्यान करताना शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर लक्ष केंद्रित करा. त्या त्या अवयवांचे दुखणे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळेसुद्धा तणाव कमी होऊ शकतो.
  • एखादी प्रार्थना किंवा धार्मिक मंत्र किंवा प्रेरणादायी शब्दांचा जप करा. कारण यामुळे ध्यान करताना लवकर लक्ष केंद्रित करता येऊ शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)