प्रत्येक ऋतूत डासांची दहशत असली तरी पावसाळ्यात या डासांची दहशत अधिकच वाढते. कधीकधी, डासांपासून दूर राहण्यासाठी, मच्छर प्रतिबंधक, मॉस्किटो कॉइल आणि बरेच लोक मच्छर मारण्याचे रॅकेट विकत घेतात. मात्र पावसाळ्यात या सर्व डासांना पळवण्यात अपयश येते. अशा परिस्थितीत आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही डासांपासून सुटका मिळवू शकता. विशेष म्हणजे हे घरगुती उपाय आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर केला जाणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी १० घरगुती उपाय

  • रॉकेल

रॉकेलमध्ये खोबरेल तेल आणि कडुनिंबाच्या तेलाचे काही थेंब, कापूरचे दोन तुकडे मिसळा. हे तेल कंदिलात टाकून ते जाळल्याने डासांपासून सुटका होते.

  • लिंबू आणि लवंग

बेडजवळ लिंबू आणि लवंग ठेवल्यानेही डास तुमच्या आजूबाजूला फिरकणार नाहीत. यासाठी फक्त एक लिंबू घ्या, ते काप, त्यात काही लवंगा भरून बेड जवळ ठेवा.

  • कडुलिंबाच्या तेलाचा दिवा लावावा

कडुलिंब कडू आहे. त्यामुळे त्याच्या वासाने डास पळून जातात. दररोज झोपताना अंथरुणापासून काही अंतरावर कडुलिंबाच्या तेलाचा दिवा लावा. त्यात कापूरचा छोटा तुकडा टाका.

Heart Attack: चेहऱ्याच्या ‘या’ भागांमधील वेदनेकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो हृदयविकाराचा इशारा

  • पुदिन्याचा रस शिंपडा

पुदिन्याचा रस देखील डासांना दूर करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. यासाठी फक्त पुदिना बारीक करून त्याचा रस काढा. शरीरावर लावा किंवा घरी फवारणी करा.

  • घरामध्ये तुळशीचे रोप लावा

तुळशीचे रोप डासांना दूर करते. यासोबतच तुळशीच्या पानांचा रस काढून शरीरावर लावल्यास डास चावत नाहीत.

  • तमालपत्र

तमालपत्राच्या धुरापासूनही डास पळून जातात. यासाठी तुम्ही एक मातीचे भांडे घ्या. त्यात तमालपत्र जाळून संपूर्ण घरात धूर दाखवा. असे केल्याने डास पळून जातील.

  • संत्र्याची वाळलेली साल देखील गुणकारी

संत्री खायला जेवढी चवीला छान लागते, तेवढीच ती डासांना घालवण्यासाठीही प्रभावी आहे. सुक्या संत्र्याची साल कोळशाने जाळल्यास सर्व डास घरातून पळून जातील.

  • मच्छरदाणी वापरा

डासांपासून दूर राहण्यासाठी मच्छरदाणी हा देखील एक चांगला मार्ग आहे. रोज झोपताना मच्छरदाणी लावल्याने डासांना प्रतिबंध होईल.

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

  • घराभोवती झेंडूच्या फुलांची झाडे लावा

झेंडूच्या फुलांचा वास डासांना घरात जाण्यापासून रोखतो. त्यामुळे घराभोवती झेंडूची झाडे लावल्यास डास घरापासून दूर राहतात. अशा प्रकारे तुमची डासांपासून सुटका होईल.

  • झोपण्यापूर्वी लसूण खा

लसणाचा वासही डासांना दूर ठेवण्याचे काम करतो. झोपताना लसणाची एक पाकळी चावा. असे केल्याने शरीरातील रक्ताभिसरणही सुरळीत होईल आणि डासही दूर पळतील.

डास चावल्यावर सूज येणे, खाज सुटणे, त्वचा संक्रमण कसे टाळावे

  • डास चावल्यावर कडुलिंबाची पाने आणि मध यांचे मिश्रण लावल्याने आराम मिळतो.
  • तुळस कोणत्याही प्रकारच्या परजीवी संसर्गावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याची पाने बारीक करून पेस्ट लावल्याने आराम मिळतो.
  • कोरफडीचा रस नैसर्गिक रोग प्रतिरोधक मानला जातो, त्यात वेदना कमी करणारे गुणधर्म असतात.
  • गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप हे अँटीहिस्टामाइन्सचे स्त्रोत आहे जे कीटकांच्या चाव्याव्दारे होणाऱ्या वेदना आणि अस्वस्थतेपासून आराम देते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon tips get rid of mosquitoes in the rainy season these home remedies will be effective pvp
First published on: 21-06-2022 at 10:21 IST