Mouth cancer early symptoms: तोंडाचा कर्करोग हा तोंडाच्या आतील ऊतींमध्ये एकसमान आणि नियंत्रित पेशींच्या वाढीमुळे होणारा एक गंभीर आजार आहे. या आजाराचे नाव ऐकताच आपल्या मनात सर्वांत आधी तंबाखू, सिगारेट आणि मादक पदार्थ यांच्यासंबंधीचे विचार प्रकर्षाने येऊ लागतात, जी त्याची मुख्य कारणे आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का की, तोंडाचा कर्करोग केवळ मादक पदार्थांमुळेच होऊ शकतो असे नाही, तर एचपी संसर्ग, तोंडाची अस्वच्छता, दंत समस्या, वारंवार होणाऱ्या जखमा किंवा दातांमधील सणक वा ठणके, पौष्टिकतेची कमतरता आणि आनुवंशिकता हे बाबीदेखील यासाठी जबाबदार आहेत.

लखनऊच्या श्रीराम मेमोरियल हॉस्पिटलचे ईएनटी सर्जन डॉ. अनुराग दिवाण म्हणाले की, जर वारंवार तोंड येत असेल आणि तो त्रास दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटावे. तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे किरकोळ असू शकतात: परंतु कालांतराने ती गंभीर स्वरूप धारण करू शकतात. तोंडाचा कर्करोग म्हणजे काय, तो तोंडात कुठे होतो, त्याची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत आणि तो कसा रोखता येईल यासंबंधीची माहिती जाणून घ्या.

तोंडाचा कर्करोग म्हणजे काय?

तोंडाचा कर्करोग हा एक असा कर्करोग आहे, जो ओठ जीभ, वरचे ओठ, खालचे ओठ, जिभेचा मागचा भाग (डोर्सम) व जिभेचा तळवा अशा कोणत्याही एका भागाला वा अनेक भागांना ग्रासू शकतो.

तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे काय आहेत?

  • तोंडातील २-३ आठवड्यांतही न बरे होणारे व्रण.
  • गालाच्या आत किंवा हिरड्यांवर जाड किंवा कडक डाग.
  • तोंडाच्या आत किंवा जिभेवर पांढरे किंवा लाल डाग.
  • चघळण्यास, बोलण्यास किंवा गिळण्यास त्रास होणे.
  • दात सैल होणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय दात पडणे.
  • घसा खवखवणे
  • कानदुखी
  • जबड्याला किंवा गालाला सूज येणे
  • तोंडातून वारंवार रक्त येणे
  • आवाजात बदल
  • श्वासाची दुर्गंधी
  • अचानक वजन कमी होणे
  • भूक न लागणे
  • घशात बराच काळ टिकून राहणारी गाठ ही तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात.

तोंडाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या आवश्यक आहेत?

तोंडाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी बायोप्सी केली जाते. बायोप्सी आणि इतर चाचण्यांचा अवलंब करून या आजाराचे निदान करता येते. जर तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाले, तर तो सहजपणे नियंत्रित केला जाऊ शकतो.

तोंडाच्या कर्करोगावर उपचार

या कर्करोगावर त्याच्या वाढीनुसार शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी व केमोथेरपी अशा तीन प्रकारे उपचार केले जातात.

आजार कसा टाळायचा?

तंबाखू, सिगारेट व गुटखा यांसारख्या मादक पदार्थांचे सेवन टाळा.
संतुलित आहार घ्या. तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
तोंड आणि दातांची चांगल्या प्रकारे स्वच्छता ठेवा.
तोंडाचा कर्करोग बरा होऊ शकतो. परंतु, त्यासाठी लक्षणे लवकर ओळखा आणि हा दुर्धर विकार टाळा.