Narak Chaturdashi 2025: दिवाळी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. छोटी दिवाळीला नरक चतुर्दशी असेही म्हणतात. या दिवशी दीर्घायुष्याची देवता यमराजाची पूजा केली जाते आणि सौंदर्य प्राप्त करण्यासाठी काही विधी केले जातात. घरात देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या नवीन मूर्ती स्थापित करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी श्री कृष्णाचीही पूजा केली जाते, कारण त्यांनी या दिवशी नरकासुराचा वध केला होता. यावर्षी छोटी दिवाळी १९ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती…
वैदिक कॅलेंडरनुसार, नरक चतुर्दशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. या वर्षी चतुर्दशी तिथी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होईल आणि २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी संपेल. म्हणून छोटी दिवाळी १९ ऑक्टोबर रविवारी साजरी केली जाईल.
पूजेसाठीचा शुभ मुहूर्त
छोटी दिवाळीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त १९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ४१ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असेल. या काळात तुम्ही पूजा करू शकता.
छोटी दिवाळीचे महत्त्व
या दिवशी श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला आणि १६ हजार महिलांना त्याच्या कैदेतून मुक्त केले. या प्रसंगाची आठवण म्हणून लोकांनी दिवे लावले आणि त्यालाच छोटी दिवाळी म्हणून साजरी केली जाते. नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी ही उत्तर भारतात हनुमान जयंती म्हणूनदेखील साजरी केली जाते. हनुमानाचा जन्म याच दिवशी मध्यरात्री झाला होता असं मानलं जातं.