National Girlfriend Day 2023: कोणत्याही नात्यामध्ये प्रेम असणे फक्त पुरेसे नाही तर ते व्यक्तही करता आलं पाहिजे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला नॅशनल गर्लफ्रेंड डे साजरा केला जातो. हा दिवस प्रेमात असलेल्या प्रत्येक जोडप्यासाठी खास असतो. काही लोकांना असे दिवस साजरे करून आपलं प्रेम व्यक्त करायला फार आवडतं. अशा वेळी कित्येक लोक महागडे गिफ्ट आणि सरप्राइज देऊन प्रेम व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा नक्कीच चांगला पर्याय आहे पण तुमच्याकडे फार पैसै किंवा वेळ नसेल किंवा तुम्हाला जर काहीतरी वेगळे करायचे असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही भन्नाट आयडिया आहेत. आम्ही काही सोपे पर्याय सुचवणार आहोत जे वापरून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करून गर्लफ्रेंडला खुश करू शकता.

गर्लफ्रेंडला महागडे गिफ्ट न देता, असे व्यक्त करा तुमचं प्रेम

१. प्रेम पत्र लिहा
स्मार्टफोनच्या जगात लोक पटकन मेसेज किंवा इमोजी पाठवून आपले प्रेम व्यक्त करू शकतात पण तुम्ही नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करु इच्छित असाल तर तुम्हा थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमची गर्लफ्रेंड तुमच्यासाठी खास का आहे , तिच्या बरोबर असण्यामुळे तुम्हाला किती आनंद होतो, ती सोबत नसेल तर तुम्ही किती दुख होता…अशा सर्व गोष्टी तुम्ही या प्रेम पत्रात लिहू शकता. विश्वास ठेवा हे पत्र वाचून तिला जो आनंद होईल तो पाहण्यासारखा असेल.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
long distance marriage marathi news, long distance marriage tips
समुपदेशन : ‘लाँग डिस्टन्स’ लग्न टिकतात?

हेही वाचा – कपलनंतर आलं आता Throuple Relationship! जगभरात होतेय चर्चा, जाणून घ्या काय आहे ही भानगड?

२. गर्लफ्रेंडच्या आवडीच्या गोष्टी एकत्र करा
तुमच्या गर्लफ्रेंडला ज्यामुळे आनंद होईल अशा गोष्टी एकत्र करा. जसे की, गर्लफ्रेंडला जर आवडत असेल तर एकत्र डान्स करा, एकत्र जेवण बनवा, एकत्र गाणी ऐका किंवा एकत्र वर्कआऊट करा.

३. गर्लफेंडला तुमचा वेळ द्या
एक गोष्ट अशी ज्यामुळे तुमची गर्लफ्रेंड खूप जास्त आनंदी होईल. काम आणि आयुष्याच्या धावपळीतमध्ये आपण बऱ्याचदा एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. म्हणूनचा तुमच्या गर्लफ्रेंडला आनंद करण्यासाठी आणि तुमचे नातं आणखी दृढ करण्यासाठी तुम्ही तिला तुमचा वेळ द्यायला पाहिजे. तुम्ही गर्लफ्रेंडबरोबर गप्पा मारा, तिला हसवा, तिच्याबरोबर चालायला जा. तुमचा थोडासा वेळ तिला आनंदी करू शकतो.

हेही वाचा – Delicate Dumping : ब्रेक-अप करण्याचा नवा फंडा! तुम्ही आहात का अशा नात्यात? एक्सपर्टने दिला सावधानतेचा इशारा

४. गर्लफ्रेंडसाठी तयार व्हा
गर्लफ्रेंड डे दिवस खास बनवू शकता. तुम्ही तिच्यासाठी तयार व्हा. एक दिवस गर्लफ्रेंडच्या आवडीचा शर्ट किंवा टीशर्ट घालू शकता. तुमचा हा छोटासा प्रयत्न देखील तिला आनंद देऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला स्वत:च्या आवडी-निवडीनुसार राहायला आवडते पण एखादा दिवस तुम्ही दुसऱ्याची आवड जपू शकता.

हेही वाचा – रंगाच्या भिंती तोडू पाहणाऱ्या सावनीची चूक तरी काय?

५. गर्लफ्रेंडला सुंदर गाणे पाठवा
तुमचं प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे गाणी. आपल्याकडे इतकी सुंदर गाणी आहेत जी तासन् तास ऐकत राहावे असे वाटते. तुम्ही कितीही बिझी असला तरी आजच्या खास दिवशी तुमच्या गर्लफ्रेंडला आवडत असलेले किंवा कोणतही सुंदर गाणे पाठवून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.

तुमचा हा छोटासा प्रयत्नही तुमच्या नात्यात प्रेम टिकवण्यासाठी पुरेसा आहे.