What Is Throuple Relationship: रिलेशनशिप म्हणजे काय? असा प्रश्न कोणी विचारला तर उत्तर असेल एकमेकांवर प्रेम करणाऱ्या किंवा एकमेकांसोबत राहू इच्छिणाऱ्या सहमतीने एकत्र आलेल्या दोन व्यक्ती. रिलेशनशिपची साधी व्याख्या आता काळानुसार बदलतेय. आजकाल तुम्ही लेस्बियन रिलेशनबद्दलही ऐकले असेल पण, आता थ्रोपल रिलेशनशिपची चर्चा जोरात सुरू आहे. हे नातं इतकं विचित्र आहे की त्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही देखील चक्रावून जाल. थ्रपल रिलेशनशिप म्हणजे या नात्यात दोन नव्हे तर तीन व्यक्ती प्रेमसंबंधात राहतात. एकाच छताखाली राहातात आणि पती-पत्नीसारखे जीवन जगतात. या तिघांपैकी कोणाचाही या नात्यावर आक्षेप नसतो. उलट ते अगदी आनंदाने जगतात. आता हे थ्रपल रिलेशनशनिप काय आहे हे जाणून घेऊ या.

आता सुरु झाला थ्रपल रिलेशनशिपचा ट्रेंड

रिलेशनशिपच्याबाबतीत जगभरातील लोकांची मानसिकता आता बदलत आहे. आजच्या काळात रिलेशनशिपच्याबाबतीत लोक अतिशय व्यवहारिकपणे आणि समजूदारपणे भूमिका घेतात. पण गेल्याकाही काही काळापासून रिलेशनशिपच्या नव्या व्याख्या आणि नवीन उदाहरणे समोर येत आहेत. सध्या थ्रपल रिलेशिपची सगळीकडे चर्चा होत आहे. खरंतर, नुकताच काही जागतिक पातळीवरील काही माध्यामांनी जाहीर केलेल्या अहवालामध्ये एका संशोधनाचे उदाहारण देते थ्रपल रिलेशनशिपबाबत माहिती देण्यात आली.

Shocking Video E Rickshaw Driver Drags Man On Road man accused the driver of stealing gas cylinders
धक्कादायक! चोरीचा आरोप, संतप्त चालकाने व्यक्तीला रिक्षाला बांधून नेले फरफटत; पाहा VIDEO
Viral Video Woman Priceless Reaction Of Receiving Roses and letter stranger gesture of kindness Will Win Your Heart
VIDEO: तिचा प्रवास ठरला खास! आधी दिलं गुलाब, नंतर दिली चिट्ठी… ‘तरुणाचा’ दयाळूपणा पाहून तुमचेही मन भारावेल
Viral Video A Man On A Wheelchair bound man bungee jumping Impressed Internet Watch Ones
VIDEO: अशक्य काहीच नसतं! दिव्यांग व्यक्तीनं धाडसानं केलं बंजी जम्पिंग; सोशल मीडियावर होतंय कौतुक
Viral Video Dr Falguni Vasavada encouraging and telling women to her self-love advice while preparing fruit salad
‘आज जेवणासाठी काय बनवू…’ महिलांच्या आवडी-निवडी सांगणारा हृदयस्पर्शी VIDEO, तुम्हालाही विचार करायला पाडेल भाग

दोघांच नव्हे तिघांच नातं!

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या कोलोरोडो येथे राहणाऱ्या अलाना, केव्हीन आणि मेगन नावाच्या तीन लोकांच्या नात्यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांना इंस्टाग्रामवर आपेल कित्येक फोटो शेअर केले आहे आणि ते थ्रपल असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपल्या नात्याबाबत मोकळेपणाने चर्चा केली. त्यांच्या घरातले लोक देखील या नात्यामुळे आनंदी आहे. या रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी अलाना केव्हीनची गर्लफ्रेंड होते. पण तिला आणखी कोणीतरी सोबत असावे असे वाटत होते. त्यासाठी त्यांची भेट मेगनसोबत झाली.

हेही वाचा – Delicate Dumping : ब्रेक-अप करण्याचा नवा फंडा! तुम्ही आहात का अशा नात्यात? एक्सपर्टने दिला सावधानतेचा इशारा

आनंदाने एकत्र राहातायेत तिघं, कसलंही ईर्षा किंवा तक्रार नाही!

आता हे तिघही एकत्र राहतात. अलाने सांगितले की, पहिला एक महिना आम्ही फक्त गप्पा मारल्या आणि एकमेकांना कॅफमध्ये भेटू लागलो. त्यानंतर आमच्यामध्ये विश्वास निर्माण झाला की आम्ही तिघे एकमेकांसोबत एकत्र राहू शकतो. तिघांनाही एकमेकांबाबत इर्षा वाटत नाही कारण आम्ही एकमेकांकडे व्यवस्थित लक्ष देतो. एकत्र चित्रपट पाहतो , फिरायला जातो आणि जेवायाला जातो.या तिघांचे एक जॉइंट इंस्टाग्राम अंकाऊट देखील आहे जिथे हे एकमेकांसोबतचे फोटो शेअर करतात.

हेही वाचा – तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात का? नात्यात या गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करु नका

पती पत्नीसारखं जीवन जगतात तिघं

आणखी एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार अलानाने सांगितले की बायसेक्शअल आहे आणि हे अनुभवण्यासाठी तिने मेगनची भेट केव्हिनला करून दिलीय तिला वाटले की केव्हीन तयार होणार नाही पण नंतर त्याने थ्रपल रिलेशनशिपमध्ये येण्याचा निर्णय मान्य केला. अलानाने सांगितले की, मेगनसोबत ती इंटमेट रिलेशनमध्ये आहे पण, त्याची केव्हिनला काही अडचण नाही. विशेष म्हणजे आता केव्हीन देखील मेगनसोबत रोमँटीक रिलशिपमध्ये आहे.

हेही वाचा – पॉकेटिंग रिलेशनशिप म्हणजे काय? त्याचा नात्यावर होणारा परिणाम जाणून घ्या

जगभरात आहे अनेकांचे आहेत थ्रपल रिलेशनशिप

सध्या तिघं अगदी आरामात एकत्र राहात आहे. तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की थ्रपल रिलेशनशिपची ही पहिली वेळ नाही. जगभरामध्ये असे कित्येक रिलेशनशिप आहेत ज्यामध्ये तीन पार्टनर एकत्र राहतात आणि आनंदात आहे. एका रिलेशनशिप एक्सपर्टनुसार, हे फार रंज आहे आणि हे खरचं शक्य आहे. लोक ज्या पद्धतीने आनंदी राहणे शक्य आहे त्यांनी राहिले पाहिजे. त्यांनी सांगितले की ही सुरुवातीला हे सर्व लपवून करत होते आणि आता हे सर्व मोकळेपणाने करतात. या सर्व गोष्टी युरोपमधील कित्येक देशांमध्ये घडत असतात.