Natural Remedies for Kidney Stones: आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत एक ना अनेक आजार लोकांना घेरून बसले आहेत. मधुमेह असो, फॅटी लिव्हर असो किंवा मग पचनसंस्थेशी संबंधित समस्या; प्रत्येक आजाराने लोकांच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर प्रचंड परिणाम केला आहे. याच आजारांमध्ये एक धोकादायक आणि असह्य वेदना देणारा आजार म्हणजे किडनी स्टोन.

हा स्टोन आकाराने छोटा असला तरी त्याच्यामुळे होणारा त्रास मात्र असह्य असतो. अचानक उठणाऱ्या पोटदुखीच्या वेदना, श्वास घ्यायलाही त्रास होणे, शरीर थकून जाणे हे सगळे अनुभवलेल्या रुग्णांनाच कळते की स्टोन किती भीषण असतो. साधारणतः डॉक्टर औषधे, इंजेक्शन किंवा अगदी शस्त्रक्रियेद्वारे हे स्टोन बाहेर काढतात. पण, तुम्हाला माहीत आहे का? काही घरगुती आयुर्वेदिक उपायही आहेत, जे या त्रासातून सुटका देऊ शकतात.

आज आम्ही तुम्हाला असे ७ सोपे पण प्रभावी आयुर्वेदिक ड्रिंक्स सांगणार आहोत, जे किडनीतील दगड बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतात. पण, सावधान हे उपाय नियमितपणे करणे गरजेचे आहे.

किडनी स्टोनचा त्रास संपवणारे ७ पेय

१. भरपूर पाणी प्या

हायड्रेटेड राहणे हे दगड बाहेर काढण्याचे पहिले व महत्त्वाचे पाऊल आहे. दिवसाला २ ते ४ लिटर पाणी प्यायल्याने किडनीतील टॉक्सिन्स बाहेर पडतात, मिनरल्स विरघळतात आणि स्टोन हळूहळू निघून जातात.

२. लिंबाचा रस

लिंबाच्या रसातील सिट्रिक ऍसिड हे शरीरातील क्षार व मिनरल्स हे किडनीमध्ये टिकू देत नाहीत. जेवणाआधी पाण्यात लिंबाचा रस मिसळून घेतल्यास फायदा होतो.

३. सफरचंद व्हिनेगर

यात असलेले अॅसिटिक अॅसिड स्टोन विरघळवते. १-२ चमचे सफरचंद व्हिनेगर पाण्यात मिसळून जेवणाआधी घेतल्यास परिणाम दिसतो.

४. तुळशीचा रस

तुळशीमध्ये असे नैसर्गिक घटक आहेत जे युरिक अॅसिड कमी करतात आणि स्टोन तुटण्यास मदत करतात. रोज एक चमचा तुळशीचा रस उपयुक्त ठरतो.

५. गव्हांकुराचा रस (Wheatgrass Juice)

हा नैसर्गिक मूत्रल (Diuretic) आहे, त्यामुळे लघवीची मात्रा वाढते आणि स्टोन बाहेर ढकलला जातो. यातील अँटीऑक्सिडंट्स किडनीला बळकट करतात.

६. ओव्याचं पाणी

ओव्यामध्ये भरपूर पोषक तत्त्वं असून ते लघवीच्या आरोग्यास मदत करतात. हे नियमित प्यायल्यास कॅल्शियमचे स्टोन रोखता येतात.

७. डाळिंबाचा रस

डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स लघवीतील क्रिस्टल्स कमी करतात आणि नव्याने स्टोन होण्यापासून वाचवतात.

या उपायांमुळे स्टोन औषधांशिवाय बाहेर पडू शकतो, पण परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतो. डॉक्टरांचा सल्ला घेणे विसरू नका.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)