Natural Remedy for Cholesterol: आजकाल अनेक जण खराब कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहेत. कोलेस्ट्रॉल रक्तात आढळणारा असा घटक आहे, जो शरीरातील निरोगी पेशींसाठी आवश्यक असतो. कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात व्हिटॅमिन डी आणि हार्मोन्स तयार होतात, ते योग्य पचनासाठी पित्त तयार करते, जे पचनक्रियेस गरजेचे असते. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत, एक चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे खराब कोलेस्ट्रॉल. चांगल्या कोलेस्ट्रॉलमुळे शरीरातील अवयवांचे सुरळीतपणे कार्य होते, तर खराब कोलेस्ट्रॉलमुळे शरीर आजारी पडते. अशा वेळी शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. परिणामी, हृदयरोग, स्ट्रोक आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे.
कोलेस्ट्रॉल रक्तात आढळणारा असा घटक आहे, जो शरीरातील निरोगी पेशींसाठी आवश्यक असतो. दिसायला निरुपद्रवी वाटणारा हा कोलेस्ट्रॉल हळूहळू शरीराच्या नसांमध्ये साचते आणि पुढे जाऊन हृदयविकार, ब्लॉकेज व स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचे कारण ठरते. डॉक्टर सतत सांगतात की, हृदय निरोगी ठेवायचं असेल, तर कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. पण, लाखो लोकांना अजूनही याचं समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही.
मात्र, आयुर्वेद आणि आधुनिक संशोधन दोन्ही एकाच गोष्टीकडे बोट दाखवत आहेत. घराघरात सहज मिळणारी अशी एक वस्तू आहे, जी नसांमधील कोलेस्ट्रॉल बाहेर फेकून देण्याची ताकद ठेवते. ही वस्तू महागड्या औषधांत मिळत नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरात ती असते.
प्रश्न असा की, शेवटी ती वस्तू आहे तरी कोणती? आणि ती खाल्ल्याने शरीरात असा काय बदल घडतो की, वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) घटते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) टिकून राहते?
संशोधन सांगते की, या पदार्थात असे खास एलिसिन (Allicin) संयुग असते, जे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी १० ते १५ टक्क्यांनी कमी करू शकते. इतकेच नाही, तर या पदार्थातील नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट्स रक्ताभिसरण सुधारतात, नसांमध्ये प्लाक तयार होणं कमी करतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
आता उत्सुकता इथेच संपत नाही… कारण हा उपाय केवळ कोलेस्ट्रॉल कमी करीत नाही, तर शरीरातील सूज (Inflammation) कमी करून हृदयाचं संरक्षण करतो. याचा योग्य प्रमाणात वापर केला, तर तो हृदयासाठीच नव्हे, तर एकूणच आरोग्यासाठी ते वरदान ठरू शकते. पण अट एवढीच की, प्रमाण जपलं पाहिजे. जास्त खाल्ल्यास पोटदुखी, जळजळ होऊ शकते.
मग, या रहस्यमय पदार्थाचा वापर करायचा तरी कसा? काही जण सकाळी रिकाम्या पोटी त्याच्या दोन पाकळ्या खातात, तर काही त्याचा वापर चटणी, लोणचं, सूप किंवा भाज्यांमध्ये करतात. अगदी चहा करून प्यायलात तरी त्याचे फायदे मिळतात.
तो पदार्थ दुसरा-तिसरा कोणी नसून आपल्याच स्वयंपाकघरातला लसूण (Garlic) आहे. लसूण हा केवळ मसाल्याची चव वाढवणारा पदार्थ नाही, तर नसांमध्ये साचलेले कोलेस्ट्रॉल बाहेर फेकून देणारा नैसर्गिक पदार्थ आहे. त्यामुळेच आयुर्वेदिक ग्रंथांपासून आधुनिक मेडिकल रिसर्चपर्यंत लसूण हृदयासाठी रामबाण मानला जातो.
निष्कर्ष असा की, आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम आणि योग्य प्रमाणात लसूण ही त्रिसूत्री जपली, तर हृदयाचं आयुष्य अनेक वर्षांनी वाढू शकतं.