Viral Video : दागिने हा स्त्रियांचा अतिशय आवडीचा विषय आहे. कोणत्या ड्रेसवर कोणते दागिने घालावे, हा प्रश्न अनेकदा महिलांना पडतो. अनेकदा खूप दागिने असून ड्रेसवर सूट होईल असा दागिना घालता येत नाही. तुम्हालाही हाच प्रश्न पडतो का? जर होत तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीमध्ये आम्ही ड्रेसच्या गळ्याचा आकार पाहून त्यावर कोणते दागिने घालता येईल त्याविषयी जाणून घेणार आहोत. (how to wear Necklaces for Different Necklines watch viral video)

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये ड्रेसनुसार कोणते दागिने घालायचे, याविषयी सांगितले जाते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.या व्हिडीओमध्ये गळ्याच्या आकारानुसार कोणते दागिने घालता येईल, हे सांगितले आहे.

या व्हायलल व्हिडीओमध्ये नेकलाइनचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहे. जसे की स्वीट हार्ट नेक, ऑफ शोल्डर नेक, स्क्वेअर नेक, राउंड नेक, आणि वी नेक. या नेकलाइनवर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने सुद्धा घालून दाखवले आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रेसच्या गळ्याची डिझाइन खडूने काढताना दिसत आहे आणि त्यावर सूट होईल असे दागिने घालून दाखवत आहे. त्यावरून तुम्हाला कळेल की कोणत्या नेकलाइनवर कोणता नेकलेस सुट होतोय. व्हिडीओवर लिहिलेय, “आता विचारा नको की तुमच्यावर कोणत्या प्रकारचा दागिने सूट होतील” व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही नेहमीचा प्रश्न सुटेल आणि तुम्ही सुद्धा ड्रेसनुसार योग्य दागिने निवडू शकाल.

हेही वाचा : दररोज किती प्रमाणात फायबरयुक्त आहार घ्यावा? जाणून घ्या, फायबरच्या अतिसेवनाने कोणते दुष्परिणाम होतात?

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “आता बोला” लेक दहावीला पास झाल्यानंतर टोमणे मारणाऱ्या शेजाऱ्यांच्या घरासमोर वाजवला ढोल; VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

heenamakeoverkosli या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. एवढंच काय तर पुरुषांनी सुद्धा या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली. मी हा व्हिडीओ भविष्यासाठी सेव्ह करतेय” तर एका युजरने लिहिलेय, “आम्ही सर्व प्रकारचे दागिने सर्व ड्रेसवर वापरतो” आणखी एका युजरने विचारलेय, “कॉलर गळ्याच्या ड्रेसवर कोणते दागिने घालायचे?” त्यावर याच इन्स्टाग्राम अकाउंटवरून सांगण्यात आले की कॉलर ड्रेसवर लांब चेन सारखा रानी हार घालावा”