Healthy Lifestyle : निरोगी आरोग्यासाठी चांगली जीवनशैली आणि पौष्टिक आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा आपण आहाराकडे लक्ष देत नाही. यामुळे आपल्या शरीरास उपयुक्त प्रोटिन्स, मिनरल्स आणि फायबरयुक्त आहार मिळत नाही. आज आपण आहारातील फायबरचे महत्त्व आणि नियमित किती प्रमाणात फायबरचे सेवन केले पाहिजे, हे जाणून घेणार आहोत.

फायबर हा आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. फायबरच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत राहते, रक्तातील साखर नियंत्रित राहते, याशिवाय इतर अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हैदराबाद येथील केअर हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जी. सुषमा यांनी फायबरचे अति सेवन केल्यानंतर काय होते, याविषयी सांगितले आहे.

Benefits of Walking after Dinner
तुम्ही रोज रात्री जेवल्यानंतर ३० मिनिटे शतपावली कराल तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Why You Should Avoid Eating Between 4 to 6 PM
4 to 6 PM Snacks: या दोन तासात खाणं म्हणजे शरीराशी शत्रुत्व! डॉक्टर सांगतायत भूक लागलीच तरी काय खावं?
Bhabi Ji Ghar Par Hai actor Firoz Khan dies of heart attack
‘भाभी जी घर पर है’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; उन्हाळयात पुरुषांसाठी धोका कसा वाढतो, उपाय काय करावे? तज्ज्ञांनी दिलं उत्तर
never throw away used chaipatti or tea leaves after making chai
Kitchen Jugaad : चहा बनवल्यानंतर गाळण्यातील चहापत्ती फेकू नका; असा वापर करा, पाहा VIDEO
Health Special during Adapting to missing organ
Health Special: नसलेल्या अवयावशी जुळवून घेताना.. (अॅमप्यूटेशन नंतरच पुनर्वसन)
cluster beans seven amazing benefits
गवारीची भाजी खायला आवडत नाही? ‘हे’ सात जबरदस्त फायदे वाचल्यावर ही भाजी आवडीने खाल

सुषमा सांगतात, “फायबरचे अतिसेवन केल्याने तुमच्या शरीरावर परिणाम करणाऱ्या अनेक प्रकारच्या शारीरिक प्रक्रिया होऊ शकतात. जेव्हा तुम्ही शरीरात फायबरचे अतिसेवन करता तेव्हा शरीरावर ताण येतो, यामुळे पचनक्रियेची समस्या उद्भवू शकते. आतड्यांच्या आरोग्यावरही याचा परिणाम दिसून येतो.

“फायबरयुक्त आहार आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी याचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यावर याचे परिणाम होऊ शकतात,” असे सुषमा सांगतात. यामुळे पोटाशी संबंधित आणि अतिसारसारख्या समस्या उद्भवू शकतात कारण फायबरमुळे लवकर पोट साफ होते. जेव्हा फायबरचे अतिप्रमाणात सेवन केले जाते तेव्हा आपल्या पचनसंस्थेवर ताण येतो.

हेही वाचा : सोयाबीन खाण्यामुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी खरोखर कमी होऊ शकते का?

फायबरचे किती सेवन करावे?

फायबर किती खावे याचे प्रमाण वय, लिंग आणि कॅलरीचे सेवन इत्यादी घटकांवर अवलंबून असते आणि त्यानुसार ते बदलते. सुषमा यांनी प्रौढांसाठी दररोज २५-३० ग्रॅम फायबरचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. हा आकडा पचनसंस्थेवर परिणाम न करता आरोग्यास फायदेशीर ठरतो, पण यापेक्षा जर तुम्ही जास्त फायबरचे सेवन केले तर त्याचा परिणाम आरोग्यावर वाईट होऊ शकतो.

अतिप्रमाणात फायबरचे सेवन केल्याने शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात, पण जर योग्यरित्या फायबरचा आहारात समावेश केला तर त्याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. आहारात फायबरचा समावेश करण्याची अनेक प्रमुख कारणे आहेत.

  • निरोगी पचनसंस्थेसाठी फायबर आवश्यक आहे. फायबर आतड्यांचे आरोग्य सुदृढ ठेवतो. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतो.
  • फायबर रक्तातील साखर शोषून घेतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
  • फायबरयुक्त आहार खराब कोलेस्ट्रॉलची पातळी ( LDL) कमी करतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
  • फायबरच्या सेवनाने वारंवार भूक लागत नाही, ज्यामुळे वजन नियंत्रित करणे सोपे जाते.