सध्या सर्वत्र नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. सरत्या वर्षाला निरोप देत, नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा उत्साह प्रचंड असतो. या उत्साहात आणि पार्टीमोडमध्ये अनेकवेळा अतिप्रमाणात मद्यपान केले जाते. पार्टी मूडमध्ये हे लक्षात येत नाही पण दुसऱ्या दिवशी हा हँगओवर खुप त्रासदायक वाटतो. अनेकांना रोजची कामं करणेही हँगओवरमध्ये कठीण जाते. अशावेळी काही सोपे घरगुती उपाय हँगओवर उतरवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.

हँगओवर उतरवण्यासाठीचे घरगुती उपाय:

Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…

भरपुर पाणी प्या
अल्कोहोलचे सेवना केल्याने लघवीचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. बऱ्याचदा मद्यपान केल्यानंतर मध्यरात्री खुप तहम लागते. याचा अर्थ शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली असून हँगओवर झाला आहे. त्यामुळे हँगओवर घालवण्यासाठी भरपुर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पार्टी करण्यापुर्वी दिवसभर तुम्ही पाणी पिऊ शकता आणि पार्टी झाल्यानंतरही पाणी पित राहा. तरीही जर दुसऱ्या दिवशी हँगओवर जाणवत असेल तर तेव्हाही पाणी पिल्याने थोड्यावेळाने टो कमी होईल.

आणखी वाचा: स्मार्टवॉच डेटानुसार करोना बुस्टर डोस हृदयासाठी सुरक्षित; लॅन्सेटमध्ये प्रकाशित अभ्यासाचा निष्कर्ष

नाश्ता टाळू नका
हँगओवरमध्ये अनेकजण नाश्ता किंवा काहीही खाण टाळतात. पण अन्नपदार्थ हँगओवर उतरवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे योग्य आणि पुरेशा प्रमाणात नाश्ता करणे आवश्यक असते.

केळी, सफरचंद
काही रिपोर्ट्सनुसार हँगओवर उतरवण्यासाठी कच्ची फळं विशेषतः केळी, सफरचंद फायदेशीर ठरतात. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ही फळं खाल्ल्याने हँगओवर कमी होण्यास मदत मिळेल.

आलं
आलंदेखील हंगोवर घालवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. आल्यामुळे अल्कोहोलचे पचन होण्यास मदत मिळते. मद्यपान केल्यानंतर अनेकदा पोटात दुखणे किंवा पोटात मळमळ जाणवू शकते. यापासून सुटका मिळवण्यासाठी आलं फायदेशीर ठरते. आल्याचे बारीक तुकडे खाऊ शकता किंवा आल्याचा चहा पिऊ शकता.

आणखी वाचा: हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘हे’ पदार्थ करतील मदत; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

टोमॅटोचा रस
टोमॅटोचा रसदेखील हँगओवर उतरवण्यासाठी फायदेशीर मानला जातो. टोमॅटोच्या रसामध्ये ग्लुकोज, एक प्रकारची साखर असते जी अल्कोहोलच्या पचनास मदत करते. काही रिपोर्ट्सनुसार टोमॅटोच्या रसामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स रक्तातील अल्कोहोलची पातळी कमी करण्यास मदत करतात.