scorecardresearch

आता कांदा कापताना येणार नाहीत डोळ्यातून अश्रू; महिलेने शोधून काढली आगळी वेगळी ट्रिक

एका महिलेने या समस्येवर उपाय शोधून काढला आहे आणि तुम्हीही याचा वापर करून अश्रू न येता सहज कांदे कापू शकाल.

Now tears will not come after cutting the onion
ट्रिना मिशेल नावाच्या महिलेने फेसबुकवर ही कल्पना शेअर केली आहे. (Photo : Pexels)

कांदा कापताना डोळ्यातून अश्रू येणं सामान्य आहे. अश्रू येण्याचे मुख्य कारण म्हणजे कांद्यामधून निघणारे रसायन तुमच्या डोळ्यात जाते. आता एका महिलेने या समस्येवर उपाय शोधून काढला आहे आणि तुम्हीही याचा वापर करून अश्रू न येता सहज कांदे कापू शकाल. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ट्रिना मिशेल नावाच्या महिलेने फेसबुकवर ही कल्पना शेअर केली आहे.

या महिलेच्या म्हणण्यानुसार, ‘जेव्हा आपण कांदे कापतो, तेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू येण्याचे कारण म्हणजे कांद्यामध्ये असलेली रसायने पाण्याच्या जवळच्या स्त्रोताकडे (जे सहसा डोळे असतात) आकर्षित होतात. यामुळे आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.’

Summer Tips : वीजेशिवायही उन्हाळ्यात घर ठेवता येणार थंड; ‘या’ टिप्सचा वापर ठरेल उपयुक्त

ट्रिना मिशेलच्या म्हणण्यानुसार, ‘कांदा कापताना वाहणारे अश्रू थांबवायचे असतील, तर ते रसायन डोळ्यांऐवजी कुठेतरी दुसरीकडे वळवावे लागेल. यासाठी एक पेपर टॉवेल घ्यावा आणि तो पाण्याने ओला करावा. यानंतर जिथे तुम्ही कांदा कपात असाल त्या ठिकाणी हा ओला टॉवेल आणि थोडे पाणी ठेवावे. असे केल्याने, कांदा कापताना त्यातून निघालेली रसायने डोळ्यांऐवजी ओल्या पेपर टॉवेलमध्ये शोषली जातील.’

Photos : उन्हाळ्यात ‘या’ मसाल्यांचे सेवन ठरू शकते हानिकारक; आजच आहारातील प्रमाण करा कमी

महिलेची ही फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. ट्रिना मिशेलने सांगितलेली युक्ती वापरून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक वापरकर्त्यांनी सांगितले की ही युक्ती खरोखरच आश्चर्यकारक आहे. त्यामुळे कांदा कापताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले नाहीत. काही लोक साशंक देखील दिसले. एका यूजरने सांगितले की, कांदा कापताना अजूनही अश्रू येत आहेत. ते म्हणाले की, हे टाळण्यासाठी चष्मा घालणे हाच एक सुरक्षित मार्ग आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Now tears will not come after cutting the onion the woman discovered a different trick pvp

ताज्या बातम्या