scorecardresearch

Oppo चा नवा फोन ५००० एमएएच बॅटरी आणि ४८ एमपी कॅमेऱ्यासह बाजारात; जाणून घ्या

Oppo च्या नव्या स्मार्टफोनबद्दल कायम युजर्समध्ये उत्सुकता असते.

Oppo_A95
Oppo चा नवा फोन ५००० एमएएच बॅटरी आणि ४८ एमपी कॅमेऱ्यासह बाजारात (Photo- OPPO Malaysia Twitter)

Oppo च्या नव्या स्मार्टफोनबद्दल कायम युजर्समध्ये उत्सुकता असते. स्वस्त आणि नवनवे फिचर्स याबाबत चर्चा असते. आता Oppo A95 मलेशियामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा नवीन फोन या वर्षी एप्रिलमध्ये चीनमध्ये लॉन्च झालेला Oppo A95 5G चा 4G पर्याय आहे. नव्या फोनची रचना 5G सारखी आहे. मात्र स्पेशिफिकेशन थोडे वेगळे आहेत. फोनच्या 4G ऑप्शनला Qualcomm Snapdragon 662 प्रोसेसरसह तयार करण्यात आलं आहे. तर, Oppo A95 5G हा फोन MediaTek Dimensity 800U प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला आहे.

Oppo A95 च्या सिंगल ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत MYR १,०९९ (अंदाजे १९,६०० रुपये) आहे. नवा फोन रेनबो सिल्व्हर आणि स्टारी ब्लॅक रंगात उपलब्ध आहेत. त्याची विक्री ओप्पोच्या अधिकृत साइटवरून सुरू करण्यात आली आहे.

Oppo A95 चे स्पेसिफिकेशन्स
ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन Android ११ आधारित ColorOS ११.१ वर चालतो आणि ६०Hz रिफ्रेश रेटसह ६.४३-इंच फुल-एचडी + (१०८०x२४०० पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ८जीबी LPDDR4x रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह Qualcomm Snapdragon 662 प्रोसेसर आहे. कार्डच्या मदतीने त्याची इंटरनल मेमरीही वाढवता येते. फोटोग्राफीसाठी त्याच्या मागील बाजूस 48MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 2MP चे आणखी दोन कॅमेरेही देण्यात आले आहेत. समोर सेल्फीसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे. त्याचबरोबर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-11-2021 at 11:47 IST

संबंधित बातम्या