ऑक्टोबर महिन्यातही भारतातील बहुतेक राज्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वातावरणातील या बदलांमुळे अनेक आजारांनी डोकं वर काढलं आहे. त्यातच पावसाळा म्हटलं की डेंग्यू मलेरियासारख्या आजाराची साथ मोठ्या प्रमाणावर पसरते. सामान्यतः सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळते. एडिस इजिप्ती या संक्रमित डासाच्या चाव्यामुळे डेंग्यू हा विषाणूजन्य ताप पसरतो. डास चावल्यानंतर जवळपास चार ते १० दिवसांमध्ये रुग्णामध्ये लक्षणे दिसण्यास सुरुवात होते.

एखाद्या रुग्णास डेंग्यू झाला असेल तर त्याला तीव्र ताप आणि अशक्तपणा जाणवतो. तसेच रुग्णाच्या प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाची स्थिती गंभीर होऊ शकते. अशावेळेस काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. डेंग्यूच्या उपचारासंबंधित तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. याआधी आपण डेंग्यूची प्राथमिक लक्षणे जाणून घेऊया.

Photos : यकृताचे आरोग्य सुधारण्यात ‘हे’ पदार्थ निभावतात सुपर फूड्सची भूमिका; आजच करा आहारात समावेश

डेंग्यूची लक्षणे

  • उच्च ताप
  • शरीर दुखणे
  • डोकेदुखी होणे
  • उलट्या होणे
  • पोटदुखी
  • अशक्तपणा
  • जास्त थकवा
  • कमी प्लेटलेट्स

डेंग्यू झाल्यास कोणती औषधे घेणे ठरेल फायदेशीर?

नवी दिल्ली येथील डॉक्टर सोनिया रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेंग्यू हा असा एक विषाणूजन्य आजार आहे, ज्यावर योग्य उपचार केल्यास काही दिवसातच रुग्ण पूर्णपणे बारा होऊ शकतो. बहुसंख्य लोकांना वाटते की डेंग्यूचा आजार झाल्यास प्रतिजैविक घेणे फायदेशीर ठरू शकते. मात्र असे केल्यास प्लेटलेटची संख्या कमी होऊन समस्या आणखीनच वाढू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत ‘पॅरासिटिमोल’ हे औषध घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. डॉक्टर रावत म्हणतात की रुग्णाने आपल्या वजनाच्या हिशोबाने पॅरासिटिमोलच्या गोळ्या घ्याव्यात. डेंग्यूच्या बहुसंख्य प्रकरणांमध्ये पॅरासिटिमोलच्या मदतीनेच उपचार केले जातात. रुग्णाची अवस्था फारच गंभीर असेल तर अन्य औषधांची शिफारस केली जाते.

रात्री शांत झोप लागत नाही? वापरा ४-७-८ ब्रीदिंग टेक्निक; मिनिटांमध्ये लागेल गाढ झोप

डॉ. सोनिया रावत म्हणतात, जर तुम्हाला ताप येत असेल, तर तुम्ही आपल्या वजनाच्या हिशोबाने पॅरासिटिमोलच्या गोळ्या घेऊ शकता. प्रतिकिलो वजनासाठी १५mg अशा पद्धतीने पॅरासिटिमोलचे सेवन करावे. उदा. जर तुमचे वजन ६० किलो आहे तर तुम्ही ९००mg पर्यंत औषध घेऊ शकता. डेंग्यूच्या आजारात रुग्ण प्रतिदिन ३ ते ४ वेळा पॅरासिटिमोल घेऊ शकतो. तसेच रुग्णाने जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करावे. दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप येत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्त तपासणी करून घ्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)