अनेक मुलं शाळेत खेळता खेळता कपड्यांवर पेनाच्या शाईचे डाग पाडून आणतात. जे साफ करणे अनेकदा अशक्य असतात. कार शाईचे हे डाग इतके घट्ट असतात की जे डिटर्जंट पावडरनेही दूर होत नाहीत. कितीही घासले, रघडले तरी शाळेच्या कपड्यांवरील शाईच्या डागाची निशाणी कायम राहते. अशावेळी शाळेत स्वच्छ कपडे घालून या असे शिक्षक वारंवार सांगत असतात, त्यामुळे मुलाच्या कपड्यावरील शाईचे डाग काढायचे कसे प्रश्न पडतो. पण आता कपड्यांवरील शाईचे डाग काढण्याची चिंता करु नका, कारण आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही शाईचे हे डाग सहज काढू शकता.
शाळेच्या कपड्यांवरील शाईचे डाग काढण्यासाठी सोप्या टिप्स
१) व्हिनेगर आणि डिश वॉश
कपड्यांवरील शाईचे डाग काढण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि डिश वॉशचा वापर करु शकता. व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही शाईचे डाग सहज काढू शकता आणि कपड्यांची चमकही पुन्हा पूर्वीसारखी राहते. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात व्हिनेगर घ्या त्यात डिश वॉश सोप मिक्स करा. यानंतर हे मिश्रण शाईचे डाग पडलेल्या कपड्यांवर लावून हलक्या हाताने रघडा आणि सुमारे ३० मिनिटे असेच ठेवा. अर्था तासांनी कपडे पाण्याने स्वच्छ करा, तुमच्या लक्षात येईल की डाग काहीप्रमाणात का होईना केला असेल.
२)कॉनस्टार्च आणि दुध
व्हिनेगर व्यतिरिक्त तुम्ही कॉनस्टार्च आणि दुधाच्या मदतीने कपड्यांवरील शाईचे डाग देखील साफ करु शकता. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एका भांड्यात कॉर्नस्टार्च आणि दूध घालून दोन्ही गोष्टी नीट मिक्स करुन घ्याव्या लागतील. यानंतर हे मिश्रण शाईच्या डाग पडलेल्या कपड्यांवर लावा आणि चांगले घासून घ्या, अर्धा तास हे कपड्यांवर तसेच राहू द्या. यानंतर पाण्यात कपडे स्वच्छ करा. हा उपाय करुन तुम्ही कपड्यांवरील शाईचे डाग दूर करु शकता.
३) बेकिंग सोडा
शाळेच्या ड्रेसवरील शाईचे डाग घालवण्यासाठी तीन चमचे बेकिंग सोडा, अर्धा कप व्हिनेगर, आणि लिंबाचा रस घ्या, यानंतर हे सर्व मिश्रण एका भांड्यात चांगले मिक्स करुन घ्या. यानंतर ही पेस्ट पांढऱ्या ड्रेसवरील शाईच्या डागावर लावा आणि सुमारे १० ते १५ मिनिटे ठेवा. यानंतर टूथब्रशच्या मदतीने डाग असलेली डागा नीट घासू घ्या. यानंतर ते ड्रेस डिटर्जंटने नीट धुवा, हा उपाय करुन तुम्ही कपड्यांवरील शाईचे डाग पूर्णपणे साफ करु शकता.