मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्यास गरज असते. थोडासा निष्काळजीपणामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे रुग्णांनी त्याच पदार्थांचा आहारात समावेश करावा, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात, असे तज्ञांचे मत आहे. भारतातील जवळपास ७ कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत रुग्णांनी अशा पदार्थांपासून दूर राहावे, ज्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो.

खरबूज खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? अनेक गंभीर आजार राहतील दूर

गव्हाच्या पिठात कार्बोहायड्रेट असते, जे साखरेच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गव्हाच्या पिठाच्या चपात्या कमी खाण्याचा प्रयत्न या रुग्णांनी करावा. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची समस्या असलेल्या लोकांनी दररोज शिळी चपाती आणि थंड दुधाचे सेवन करू नये. हवे असल्यास शिळ्या चपात्या थंड दुधात १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवा. त्यानंतर तुम्ही दिवसभरात याचे सेवन करू शकता. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Office Wear Ideas: ऑफिसमध्ये स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधुमेही रुग्ण चण्याच्या पिठाची चपाती खाऊ शकतात. याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. वास्तविक, बेसनामध्ये विरघळणारे फायबर असते, जे शरीरातील वाढत्या खराब कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास देखील उपयुक्त आहे. याशिवाय रक्तातील ग्लुकोज शोषून घेण्याची प्रक्रियाही मंदावते, त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.