अनेकांचे आपल्या बोलण्या चालण्यावर बारीक लक्ष असतं. शिवाय जर तुम्हाला कोणी असं सांगितलं की, तुम्ही तुमचा मोबाईल कसा वापरता? यावरुन तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या अनेक गोष्टी समजतात, तर त्यावर तुम्हाला विश्वास ठेवणं कठिण होऊ शकतं. पण मोबाईल वापरण्याच्या पद्धतीवरुन तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सहज अंदाज लावता येऊ शकतो. शिवाय हातातील मोबाईल तुमच्याबद्दलच्या अशा अनेक गोष्टी उघड करू शकतो, ज्याबाबत तुम्हाला कदाचित माहितीही नसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखाद्याला योग्य प्रकारे ओळखण्यासाठी आपणाला त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवणे किंवा त्यांच्या वागणुकीचे निरीक्षण करणे आवश्यक असते. परंतु तुम्हाला जर एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावायचा असेल तर त्यासाठी फक्त तो व्यक्ती त्याचा मोबाईल कसा वापरतो याकडे लक्ष द्यावं लागेल. या बातमीत आम्ही तुम्हाला एखाद्याच्या मोबाईल वापरण्याच्या स्टाईलवरुन त्याचे व्यक्तिमत्त्व कसे ओळखता येऊ शकते ते सांगणार आहोत.

हेही वाचा- पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहात? मग ‘हे’ नैसर्गिक घरगुती उपाय ट्राय कराच

एका हातात मोबाईल पकडणे –

एका हातात मोबाईल पकडून त्याच हाताच्या अंगठ्याने मोबाईल वापरणे हे तुम्ही आत्मविश्वासू असल्याचं आणि जीवनात जलद प्रगती करायची इच्छा असल्याचं दर्शवते. या व्यतिरिक्त ही पद्धतसांगते की, तुम्ही संकटांना अजिबात घाबरत नाही आणि नेहमी कठोर परिश्रम करण्यास तयार असून तुम्ही खूप आशावादी आहात.

दोन्ही हातांनी मोबाईल पकडणे –

हेही वाचा- घसा सतत खवखवतोय? तर झटपट आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करुन पाहा

दोन्ही हातांनी मोबाईल पकडणे आणि फक्त एका अंगठ्याने चालवणे ही पद्धत आपण एक सावध व्यक्ती असल्याचं दर्शवते. जे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व धोके जाणून घेतात. यासह आपण बुद्धिमान आणि सहानुभूतीशील व्यक्ती असल्याचंही दर्शवते.

मोबाईल दोन्ही हातांनी धरून दोन्ही अंगठ्याने वापरणे

मोबाईल चालवण्याच्या या पद्धतीनुसार तुम्ही उत्साही असण्यासोबतच खूप हुशारही असल्याचं सांगितलं जाते. परंतु तुमच्या भोळेपणामुळे आणि निरागसतेमुळे तुम्हाला सांसारिक बाबी हाताळण्यात अडचणी येण्याची शक्यता असते.

एका हाताने मोबाईल पकडून दुसऱ्या हाताच्या बोटाने हाताळणे –

फोन हाताळण्याची ही पद्धत दर्शवते की, तुम्ही एक साधे आणि सोपे व्यक्ती आहात आणि साहसी कृत्य करण्याचे शौकीन आहात. शिवाय तुमची कल्पनाशक्तीही मजबूत आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality test how do you use your mobile phone to define your personality learn how jap
First published on: 19-02-2023 at 18:44 IST