वॉशिंग्टन : लालसर निळय़ा रंगाचे आलुबुखार म्हणजेच प्लम हे फळ भरपूर पोषक तत्त्व आणि जीवनसत्त्वयुक्त आहे. या फळात कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, पोटॅशियम आणि फायबर असते. मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी हे फळ लाभदायी आहे. सुकवलेले आलुबुखार हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त असून ऑस्टियोपोरोसिस या अस्थिविकाराच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर असल्याचे संशोधन नुकतेच अमेरिकी संशोधकांनी केले आहे.

पेन्सिल्वेनिया विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेले हे संशोधन  ‘द अ‍ॅडवॉन्स इन न्यूट्रिशन’ या नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहे. सुके आलुबुखार आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. शरीराला फायबर न मिळाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. फायबरचे कमी सेवन झाल्याने आतडय़ांच्या हालचाली मंदावतात. मात्र नियमित सुके आलुबुखार खाल्ल्याने आतडय़ांच्या हालचालींची वारंवारत सुधारते आणि त्याचबरोबर वजन घटण्यासही मदत होते, असे या संशोधकांच्या वतीने सांगण्यात आले. ऑस्टियोपोरोसिस हा एक हाडांचा आजार असून या आजारात हाडे ठिसूळ बनतात. त्यामुळे छोटय़ाशा अपघातानंतरही फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियम व प्रोटीन यांची म्हणजेच ‘बोन मिनरल डेन्सिटीची’ झालेली कमतरता होय. वाढत्या वयाबरोबर हाडांमध्ये कॅल्शियम आणि ‘जीवनसत्त्व ड’ची कमतरता होऊन ऑस्टियोपोरोसिसची सुरुवात होते. ऑस्टियोपोरोसिसचा सर्वात जास्त परिणाम पाठीचा कणा, खुबा व मनगटाची हाडे यांवर होतो. मात्र सुक्या आलुबुखाराचे नियमित सेवन केल्यास हाडे ठिसूळ होण्यास प्रतिबंध निर्माण होतो आणि ऑस्टियोपोरोसिस हा विकार होण्यापासून कमी धोका निर्माण होते, असे या संशोधकांनी सांगितले.

AI Artist Imagines Summer In Parallel Universe viral photo
‘हाय गर्मी!’ बर्फाची टोपी, अंगावर एसी; भविष्यात असा असेल का उन्हाळा? ‘या’ AI फोटोची होत आहे तुफान चर्चा
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
How To Save Electricity Bill Through Fridge
उन्हाळ्यात फ्रिजमुळे विजेचं बिल खूप येतंय? ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; पैशांची होईल मोठी बचत, व्हिडिओ एकदा पाहाच
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन