महागाईने उपभोक्त्यांचं कंबरडं मोडलं आहे. मग ते पेट्रोल असो किंवा दैनंदिन वापराच्या वस्तू असो. त्यातच आता भर म्हणून येणाऱ्या काळात ग्राहकांना दैनंदिन वापराच्या उत्पादनांसाठी त्यांचा खिसा अधिक मोकळा करावा लागणार आहे. कारण गहू, तेल आणि इतर पाकिटबंद उत्पादनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एफएमसीजी कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहेत.

याशिवाय, रशिया-युक्रेन युद्धामुळेही एफएमसीजी कंपन्यांना धक्का बसला आहे. या युद्धामुळे गहू, खाद्यतेल आणि कच्च्या तेलांच्या किंमतींमध्ये वाढ होणार असल्याचं मत या कंपन्यांनी मांडलं आहे. तसेच या कंपन्यांनी म्हटलं आहे की, या वाढीचा काही भार उपभोक्त्यांना उचलावा लागू शकतो. डाबर आणि पार्लेजी यासारख्या कंपन्यांचे सध्याच्या परिस्थितीवर बारीक लक्ष असून ते महागाईच्या समस्येपासून लढण्यासाठी काही पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. काही अहवालांमध्ये म्हटलंय की हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्टले या कंपन्यांनी मागील आठवड्यात आपल्या खाद्य उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

पार्ले प्रोडक्टसच्या वरिष्ठ श्रेणी प्रमुख मयांक शाह म्हणाले की आम्ही उद्योग क्षेत्राकडून किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढीची अपेक्षा करतो. त्यांनी म्हटले की किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार होत आहे. अशातच किंमतींमध्ये किती वाढ होईल हे आताच सांगणे अवघड आहे. पामतेलाचा भाव १८० रुपये प्रति लिटरवर गेल्याचे त्यांनी सांगितले. आता तो १५० रुपये प्रति लिटरवर आला आहे. त्याचप्रमाणे, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १४० डॉलरवर गेल्यानंतर १०० डॉलरवर आली आहे.

कौतुकास्पद! कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर बँकेने त्याच्या कुटुंबियांना केली अशी मदत की अनेक पिढ्यांचं होणार भलं

शाह यांचे म्हणणे आहे की पूर्वीच्या तुलनेक भाव अजूनही जास्त आहेत. गेल्या वेळी एफएमसीजी कंपन्यांनी वस्तूंच्या किमती वाढवण्याचा संपूर्ण भार ग्राहकांवर टाकला नाही. आता प्रत्येकजण १०-१५% वाढीबद्दल बोलत आहेत. उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. ते म्हणाले की, पार्लेकडे सध्या पुरेसा साठा आहे. त्यामुळे दरवाढीचा निर्णय एक-दोन महिन्यांत घेतला जाईल.

डाबर इंडियाचे मुख्य वित्त अधिकारी अंकुश जैन यांनी सांगितले की महागाईचा दर कायम आहे आणि सलग दुसऱ्या वर्षी ही चिंतेची बाब आहे. ते म्हणाले, महागाईच्या दबावामुळे ग्राहकांनी खर्च कमी केला आहे. ते लहान पॅक खरेदी करत आहेत.

एडलवाइज फायनान्शियल सर्व्हिसेसचे कार्यकारी उपाध्यक्ष अबनीश रॉय म्हणाले की, एफएमसीजी कंपन्या महागाईचा बोजा ग्राहकांवर टाकत आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्ले यांच्याकडे उच्च किंमत निश्चित करण्याची ताकद आहे. कॉफी आणि पॅकेजिंग वस्तूंच्या दरवाढीचा बोजा ते ग्राहकांवर टाकत आहेत. आमचा अंदाज आहे की २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत सर्व एफएमसीजी कंपन्या किमतीत तीन ते पाच टक्क्यांनी वाढ करतील.