Priya Marathe Death Symptoms : हिंदी आणि मराठीच्या छोट्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे निधन झाले. अवघ्या ३८ व्या वर्षी प्रिया मराठेचे निधन झाले. तिच्या निधनामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. की ३८ म्हणजे तारुण्याकडून परिपक्वतेकडे वाटचाल करणारं वय असतं.. या वयात कित्येक व्यक्ती अनेक गोष्टी उमेदीनं किंवा जिद्दीनं करायला पुढे धजावतात. अशा या वयात आपल्या समवयस्क अभिनेत्रीचं निधन झाल्यामुळे तिच्या सहकलाकारांसह अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. प्रियामध्ये यादरम्यान कर्करोगाची सहा लक्षणे दिसत होती. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. तसेच जर महिलांनी शरीरातील या ५ बदलांकडे आधीच लक्ष दिले, तर त्या गंभीर आजारांपासून वाचू शकतात.

महिला कामामध्ये जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या व्यग्र होतात की, त्या त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिलांनी त्यांच्या आरोग्याबद्दल खूप जागरूक राहणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याची योग्य रीतीने काळजी घेतलीत, तर तुम्ही मोठे आणि गंभीर आजार टाळू शकाल. आरोग्य जागरूकता आपल्याला समस्या गंभीर होण्यापूर्वीच ओळखण्यास किंवा त्या टाळण्यास मदत करू शकते. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, २६% पेक्षा जास्त महिलांनी आयुष्यभर डॉक्टरकडे जाणे टाळले आहे. बऱ्याचदा महिलांमध्ये ओटीपोटात वेदना, योनीतून रक्तस्राव / असामान्य स्राव मूत्रमार्गात संसर्ग, मासिक पाळीतील अनियमितता यांसारखी लक्षणे आढळतात. ज्याकडे कित्येक महिलांकडून सामान्य बाब म्हणून दुर्लक्ष केले जाते; परंतु वास्तविक या लक्षणांकडे विशेष लक्ष देऊन, त्या संदर्भात स्त्रीरोगतज्ज्ञांकडून योग्य निदान करून घेणे आवश्यक असते.

माय लाईफ केअर अॅपवर सल्ला देणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विनीता साहनी म्हणाल्या की, महिला कितीही व्यग्र असल्या तरी त्यांनी वर्षातून एकदा तरी पूर्ण शरीर तपासणी नक्कीच करून घेतली पाहिजे. मासिक पाळीच्या कष्टदायक त्रासांपासून ते कर्करोगापर्यंत सर्व काही टाळण्यासाठी महिलांनी नियमितपणे स्त्रीरोगतज्ज्ञाची भेट घेणे अत्यावश्यक आहे.

महिलांनी लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वी आणि नंतर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, अशी की- शिफारस स्त्रीरोगतज्ज्ञांकडून केली जाते. सुरुवातीपासून रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तुमची स्थिती तपासून घेणे महत्त्वाचे आहे. जर महिलांनी शरीरातील या ५ बदलांकडे आधीच लक्ष दिले, तर त्या गंभीर आजारांपासून वाचू शकतात. महिलांच्या शरीरात दिसणारी कोणती लक्षणे चुकूनही दुर्लक्ष करू नयेत ते जाणून घेऊया.

ओटीपोटात वेदना आणि पोटात अस्वस्थता दुर्लक्षित करू नका

महिलांनी ओटीपोटात किंवा पोटातल्या वेदनांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. ही वेदना बराच काळ होत असेल किंवा अचानक होत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तीव्र पेल्विक वेदना हे संसर्गाचे, किंवा गर्भाशयातील सिस्टचे किंवा धोकादायक एक्टोपिक गर्भधारणेचे लक्षण असू शकते. सतत होणारी पोटदुखी गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स आणि कर्करोग नसलेल्या ट्यूमरचे लक्षण असू शकते.

मासिक पाळीदरम्यान रक्तस्राव

मासिक पाळीदरम्यान थोडासा रक्तस्राव होणे याला स्पॉटिंग म्हणतात आणि बहुतेक महिलांमध्ये ते सामान्य आहे. जर स्पॉटिंग जास्त, वारंवार किंवा वेदनादायक होत असेल, तर त्याबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञांशी चर्चा करावी. हे संसर्ग, सिस्ट, गर्भपात, गर्भाशयाचा कर्करोग यापैकी एखाद्या गोष्टीचे लक्षण असू शकते. रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव होणाऱ्या महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. म्हणून ताबडतोब त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्तनांमध्ये वेदना

जर महिलांना त्यांच्या स्तनांमध्ये काही असामान्य बदल जाणवत असतील, तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्तनांमध्ये वेदना, सूज, अस्वस्थता, स्तनात गाठी किंवा स्तनातून रक्त येणे ही एखाद्या मोठ्या समस्येची लक्षणे असू शकतात. म्हणून ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे इष्ट ठरते. जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने अशा लक्षणांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.

मासिक पाळीच्या समस्या आणि चुकलेल्या मासिक पाळीकडे दुर्लक्ष करू नका

आपल्या शरीरासाठी काय खास आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर महिलांना मासिक पाळीदरम्यान अशक्तपणा, जाणवत असेल, तर त्यांनी ताबडतोब स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. मासिक पाळीतील अनियमितता ही पीसीओएस, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, हार्मोनल असंतुलन समस्या यांसारख्या समस्यांची लक्षणे असू शकतात. मासिक पाळी न येणे हे गर्भधारणेचे लक्षण आहे; परंतु जर तुम्ही गर्भवती नसाल आणि तुमची मासिक पाळी येत नसेल, तर ती एक आपत्कालीन परिस्थिती असू शकते, ज्याकडे त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

जननेंद्रियाच्या भागात असामान्य स्राव आणि वेदनांकडे दुर्लक्ष करू नका

योनीतील स्राव योनी स्वच्छ करतो आणि ती निरोगी ठेवतो. या स्रावाची जाडी महिन्यातून अनेक वेळा बदलते. मात्र, जर योनीतून बाहेर पडणारा स्राव पिवळा, हिरवा किंवा तपकिरी रंगाचा असेल आणि त्याला वास येत असेल, तर तुम्ही ताबडतोब स्त्रीरोगतज्ज्ञाला भेटावे. की- योनीतील स्रा वात बदल, योनीभोवती खाज सुटणे व जळजळ होणे हे योनीसंबंधीच्या एखाद्या समस्येचे लक्षण असू शकते. दोन महत्त्वाचे यीस्ट आणि बॅक्टेरियाचे संक्रमण आहेत, ज्यांवर औषधोपचाराद्वारे उपचार करता येतात.

प्रियामध्ये दिसलेली ६ लक्षणे

  • सतत थकवा जाणवणे
  • अनपेक्षित वजन कमी होणे
  • शरीरात गाठ निर्माण होणे
  • सतत खोकला राहणे
  • पचनाच्या समस्या जाणवणे
  • अचानक रक्सस्राव होणे