नियमित हृदयस्पंदने हे निरोगी आरोग्याचे एक प्रमुख लक्षण आहे. ज्याच्या हृदयाचे ठोके नियमित पडतात ती व्यक्ती निरोगी समजली जाते. आरोग्याविषयी समस्या कोणती ही असो, डॉक्टरकडे गेल्यावर पहिली तपासणी होते ती हृदयाच्या ठोक्यांची. या हृदयाच्या ठोक्यांचे स्थिर स्पंदन होण्यास मदत करणाऱ्या सहा प्रथिनांचा शोध शास्त्रज्ञानी लावला आहे. या सहा प्रथिनांच्या सहाय्याने हृदयातील पेशींमध्ये योग्य समन्वय घडवून, हृदयस्पंदन योग्यप्रकारे होत असल्याचे सिध्द झाले आहे. अमेरिकेतील सिडर्स सिनाई हृदय संस्थेच्या शास्त्रज्ञांनी या प्रथिनांचा शोध लागळल्याचा दावा केला आहे. या प्रथिनांच्या साह्याने एका स्पंदना दरम्यान हृदयातील लाखो पेशींमध्ये समन्वय घडवला जात असल्याचे या शास्त्राज्ञांच्या अभ्यासातून समोर आले आहे. हृदयामध्ये जमा होणारी ही प्रथिने या स्पंदनांचे समन्वयक म्हणून काम पाहतात.
‘जर्नल सेल’ या नियतकालिकामध्ये हा अभ्यास प्रसिध्द करण्यात आला असून, ही प्रथिने अस्तित्वात असल्याचे या संशोधनावर कामकरणारे जेष्ठ संशोधक रॉबिन शॉ यांनी सांगितले.
या संशोधनामुळे हृदयातील पेशींमधील संवाद कसा चालतो हे समजण्यास शास्त्रज्ञांना मदत होणाऱ आहे. आरोग्यदायी हृदयस्पंदनांमुळे हृदय विकाराने होणाऱ्या मृत्यूंवर मात करण्यास मदत होणार असल्याचे शॉ यांनी सांगितले. या सहा प्रथिनांपैकी एक प्रथिन हृदयातील ‘गॅप जंक्शन’ या वाहिनीतून येत असून, इतर पाच प्रथिनांमुळे हृदयातील पेशींमधिल संवाद सोपा होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2014 रोजी प्रकाशित
नियमित हृदयस्पंदनासाठी मदतकारी प्रथिने..
स्थिर हृदयस्पंदने हे निरोगी आरोग्याचे एक प्रमुख लक्षण आहे. ज्याच्या हृदयाचे ठोके नियमित पडतात ती व्यक्ती निरोगी समजली जाते.

First published on: 15-01-2014 at 01:17 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proteins needed to produce stable heartbeat identified