R Madhavan Fitness Journey: बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते आर. माधवन यांनी केवळ २१ दिवसांत जबरदस्त वजन कमी करून सगळ्यांना थक्क केलं आहे. नेहमीच जिममध्ये घाम गाळून किंवा महागड्या डाएट प्लॅनच्या जोरावर वजन कमी होतं असं आपण ऐकतो, पण माधवन यांनी हा सगळा समज चक्क चुकीचा ठरवला आहे, कारण त्यांच्या या परिवर्तनामागे ना जिम होती, ना कुठला फॅन्सी डाएट… तर होतं ते फक्त शिस्तबद्ध जीवनशैलीचं रहस्य.

वजन घटवण्यासाठी जिममध्ये घाम गाळण्याची नाही गरज! आर माधवनने दिला भन्नाट फंडा

१. सोशल मीडियावर माधवन यांनी स्वतःचं फिटनेस सिक्रेट शेअर करताना सांगितलं, “Intermittent fasting, प्रत्येक घास ४५-६० वेळा चावून खाणं, रात्री ६.४५ वाजेपर्यंत शेवटचं जेवण, सकाळी लांब फेरफटका आणि रात्री स्क्रीनशिवाय शांत झोप… हेच माझं यशाचं गमक आहे.”

२. त्यांच्या या पद्धतीतला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खाण्याची पद्धत. माधवन म्हणतात, “आपलं अन्न पाणी समजून प्या आणि पाणी अन्न समजून चावा.” म्हणजेच प्रत्येक घास नीट ४५-६० वेळा चावल्याने पचनशक्ती वाढते, शरीराला पोषक तत्त्वांचा पुरेपूर फायदा मिळतो आणि आपण नकळत जास्त खाणं टाळतो.

३. याशिवाय त्यांनी Intermittent Fasting (ठराविक वेळेतच जेवण) कडकपणे पाळलं. रोजचं शेवटचं जेवण त्यांनी ६.४५ वाजता केलं आणि दुपारी ३ नंतर कधीच कच्चं अन्न खाल्लं नाही. कारण संध्याकाळी किंवा रात्री कच्चं अन्न पचवायला जास्त वेळ लागतो, तर शिजवलेलं अन्न शरीर पटकन पचवतं.

४. त्यांच्या आहारात भाज्या, हिरव्या पालेभाज्या, नैसर्गिक व प्रक्रिया न केलेले पदार्थ यांचा समावेश होता. प्रोसेस्ड फूडला त्यांनी पूर्णपणे रामराम केला.

५. व्यायामासाठी त्यांनी जिमचा कठोर मार्ग न निवडता साधा सकाळचा लांब फेरफटका निवडला. चालण्याने चरबी कमी होते, मूड फ्रेश राहतो आणि स्नायूंवर अनावश्यक ताण येत नाही.

६. यासोबतच त्यांनी झोपेचं शिस्तबद्ध वेळापत्रक तयार केलं. झोपण्याच्या ९० मिनिटं आधी स्क्रीनपासून दूर राहणं, खोल झोप घेणं, यामुळे शरीरात हार्मोन्सचं संतुलन टिकून राहतं आणि वजन घटण्यास मदत होते.

७. पाण्याचं योग्य प्रमाणात सेवन, साधं अन्न आणि रोजची सातत्यपूर्ण दिनचर्या एवढंच होतं त्यांच्या या चमत्कारामागचं गुपित.

आता प्रश्न असा पडतो, महागडी जिम्स आणि डाएट चार्टची गरजच नाही, फक्त शिस्त आणि साधेपणा पुरेसा आहे का? तर याचं उत्तर माधवन यांनी २१ दिवसांत सिद्ध करून दाखवलं आहे.

थोडक्यात, “खरा फिटनेस जिममध्ये नाही, तर आपल्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत दडलेला आहे.” हेच माधवन यांनी जगाला दाखवून दिलं.