सोशल मिडीयावर आपण भूवन कुमारच्या ‘कच्चा बदाम’ गाण्याची क्रेज बघितली असेलच. जसं नाव तसं काम. अर्थातच बुहुगुणी बदामचे गुणतत्त्वे ऐकाल तर आपण दंग झाल्याशिवाय राहणार नाही. सद्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे, त्वचेला खाज सुटणे, त्वचा निस्तेज होणे यांसारख्या अनेक समस्या असतात. यावर नैसर्गिकरित्या तयार केलेला बुहुगुणी ‘कच्चा बदाम’ चा फेसपॅक रामबाण उपाय आहे. चला तर जाणून घेऊया.

हिवाळयात बदामचा फेसपॅक का महत्वाचा ?

बदामाच्या तेलाचा वापर सौंदर्य उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण बदामामध्ये अॅंटि ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ई, ओमेगा थ्री फॅटी अॅसिड, प्रोटीन्स, झिंक, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात. बदाम भिजवून त्याची पेस्ट, बदामाचे तेल अथवा बदामाची पावडर सौंदर्य खुलवण्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. बदामातील घटक त्वचेत मुरतात आणि त्वचेचं सौंदर्य वाढवतात. हिवाळयाच्या वातावरणात बदाम फेसपॅक आपल्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

आणखी वाचा : Fertility Diet: महिलांनी प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

असा बनवा बदामाचा नैसर्गिक फेसपॅक

बदाम चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे हे आपणा सर्वांनाच माहित आहे. पण बदामचा उपयोग कसा करावा हे फार महत्वाचं आहे. जर तुम्ही बदामाच्या फेस पॅकचा वापर केला असेल तर याचे फायदे तुम्हाला माहीत असेलच. मात्र, तो बनवायचा कसा हे जाणून घ्या.

१. बदाम, हळद आणि बेसन पीठांचा करा वापर

यासाठी सर्वप्रथम एका वाटीमध्ये बदाम पावडर, बेसन पीठ, हळद आणि गुलाब पाणी टाकून एकत्र करा. त्याची जाड पेस्ट करा. ही पेस्ट चेहेऱ्यावर १५ ते २० मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवून टाका. चेहरा निखरेल.

आणखी वाचा : बद्धकोष्ठतेची समस्या आहे? तर ‘या’ घरगुती उपायांमुळे होईल पोट साफ

२. बदाम पावडर आणि कच्चे दूध

यासाठी एका वाटीमध्ये बदाम पावडर आणि दूध घेऊन दोन्ही एकत्र करा.जाड पेस्ट होईपर्यंत ते मिसळा. चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा त्यानंतर हा पॅक चेहरा आणि मानेवर लावा. १५ ते २० मिनिटांपर्यंत पॅक चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा पॅक तुम्ही हाताला आणि पायाला सुद्धा लावू शकता.

३. बदाम, दूध आणि ग्राउंड ओट्सचा फेसपॅक

सर्वप्रथम एका वाटीमध्ये बदाम, ग्राउंड ओट्स, दूध घेऊन एकत्र करा. झोपण्याआधी गुलाब पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. तयार झालेला पॅक १५ ते २० मिनिटं किंवा रात्रभर चेहऱ्याला लावून ठेवू शकता. जर रात्री चेहरा धुतला तर कोमट पाण्याने धुवून चेहऱ्याला नाईट क्रीम लावा. यामुळं चेह-यावर तेज येईल.

याप्रमाणे आपण या होममेड फेसपॅकचा वापर केल्यास त्वचा स्वच्छ,सुंदर आणि चमकदार नक्कीच होईल. चमकदार, मऊ, नितळ त्वचा तुमच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पाडेल.त्वचेसंदर्भात गंभीर आजार असेल तर एकदा जवळच्या वैद्यांचा सल्ला नक्कीच घ्यायला विसरू नका.