Natural Home Remedies in Marathi: सकाळच्या काही सवयी तुमचं आयुष्य बदलू शकतात. दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो असं म्हणतात. तसेच आपल्या संपूर्ण दिवसाच्या धावपळीसाठी शरीर निरोगी आणि सक्रिय असणे खूप महत्त्वाचे आहे. उन्हाळ्याच्या हंगामात लोक जास्त द्रव पदार्थ घेतात, ते देखील आवश्यक आहे. आजकाल लिंबूपाणीदेखील भरपूर प्यायले जाते. लिंबूपाण्यात जीवनसत्त्व सी, बी, फायबर, पोटॅशियम आणि अनेक अँटिऑक्सिडेंटचे गुणधर्म असतात. नियमितपणे लिंबूपाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. परंतु, लिंबूपाण्यात आणखी एक गोष्ट मिसळल्याने तुम्हाला जबरदस्त फायदे मिळू शकतात.

लहान मुले असो वा मोठे, भेंडीची भाजी खायला सर्वांना आवडते. भेंडीची भाजी टेस्टी असण्यासोबतच ती खूप हेल्दीदेखील आहे. यामध्ये जीवनसत्वे, खनिजे, पोषक घटक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. भेंडीची भाजी खाऊन शरीराला अनेक पोषक तत्त्व मिळतात. पण, भेंडीच्या पाण्याने किती फायदा होतो हे अनेकांना माहीत नसतं. फक्त भेंडीची भाजीच नाही तर त्याचे पाणीदेखील खूप फायदेशीर असते.

तुम्हाला हे माहीत आहे का की, भेंडीचं पाणी आणि त्यात एक मोठा चमचा लिंबाचा रस मिसळून पिणं तुमच्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे. आरोग्य आणि न्यूट्रिशन क्लिनिकच्या डाएटिशियन डॉ. सुगीता मुटरेजा यांच्यानुसार, हे हेल्दी ड्रिंक नियमित घेतल्यास शरीरावर अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येतात.

भेंडी आणि लिंबाचे पोषक गुणधर्म

भेंडीमध्ये व्हिटॅमिन A, C, K, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. तर लिंबामध्ये व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस अशा अनेक आवश्यक खनिजांचा समावेश असतो. या दोघांचे मिश्रण म्हणजे एक पॉवरफुल हेल्थ ड्रिंकच आहे.

जाणून घ्या ‘हे’ पाच जबरदस्त फायदे

१. ब्लड शुगर नियंत्रणात मदत

भेंडीतील सॉल्युबल फायबर आणि म्युसिलेज ब्लडमध्ये साखर शोषून घेण्याची प्रक्रिया मंदावतात. त्यात लिंबाचा रस मिसळल्यास इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते, ज्यामुळे डायबेटीसच्या रुग्णांसाठी हे विशेष फायदेशीर ठरते.

२. पचन सुधारते

भेंडीचे पाणी आतड्यांना आराम देते आणि गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवून देते. लिंबामधील सिट्रिक अ‍ॅसिड पचन एंझाइम्स सक्रिय करतं आणि पोट हलकं वाटतं.

३. वजन कमी करण्यात मदत

हे ड्रिंक कमी कॅलरीज आणि भरपूर फायबरयुक्त असते, त्यामुळे लवकर भूक लागत नाही. लिंबू मेटाबॉलिज्म वाढवतो आणि शरीर अधिक कॅलरी बर्न करतं.

४. त्वचेसाठी लाभदायक

भेंडी आणि लिंबामधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला डिटॉक्स करतात, डाग, धब्बे कमी करतात आणि नैसर्गिक चमक आणतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. रोगप्रतिकारक शक्ती वाढते

या दोघांमध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सर्दी, खोकला, अ‍ॅलर्जीपासून संरक्षण करतं.