ऑक्टोबर हिटचा त्रास हळूहळू जाणवू लागला आहे. कडाक्याच्या ऊनामुळे होणारी शरीराची काहिली दूर करण्यासाठी आपण थंडगार पाणी पितो. उन्हाळा असो किंवा ऑक्टोबर महिना थंडगार पाणी पिण्याइतका दुसरा उत्तम पर्याय असूच शकत नाही. पण तुम्हीही तहान भागवण्यासाठी वारंवार थंड पाणी पित असाल तर मात्र तुमच्या तब्येतीवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

वाचा : काळय़ा चहाच्या सेवनामुळे वजन कमी करण्यास मदत

मलावरोधास अडथळा : शरीरातील उष्मा कमी व्हावा म्हणून लोक थंड पाणी पितात. परंतु यामुळे मलावरोधास अडथळा निर्माण होतो. तुम्ही जेवढे थंड पाणी पिता त्यातला बराचसा भाग लहान आतड्यांमार्फत शोषला जातो. तो शरीराची द्रवहानी भरुन काढण्यास उपयोगी पडतो आणि नंतर मूत्रविसर्जनावाटे शरीराबाहेर फेकला जातो. पण ते पाणी जितक्या मात्रेमध्ये आतड्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आवश्यक असते तितक्या मात्रेमध्ये पोहोचत नाही. यामुळे भरपूर थंड पाणी पिऊन मलावरोधाचा त्रास होतो.
पचनशक्तीच्या कार्यात अडथळा : थंडगार पाण्यामुळे पचनकार्यातही अडथळा निर्माण होतो. थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आंकुचित होतात आणि याचा परिणाम पचनशक्तीवर देखील होतो.

सर्दी खोकला : थंड पाण्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होतो. त्याचप्रमाणे संसर्ग होऊन घसा खवखवणे, दुखणे अशा समस्यांही उदभवतात.
ऊर्जा अधिक खर्च होणे : शरीराचे एक विशिष्ट तापमान असते. थंड पाणी शरीरात गेल्याने शरीरातील अंतर्गत तापमानवर याचा परिणाम होतो. हे तापमान पूर्ववत आणण्यासाठी शरीराला अधिक उर्जा तयार करावी लागते. परिणामी चयापचय क्रियेवरही परिणाम होतो.
– थंड पाण्याच्या अतिसेवनामुळे डोकेदुखी, पाय दुखणे त्याचप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती कमी होणे यासारखा त्रासही होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : मिठाई खरेदी करताय? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा