देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे आपल्या ग्राहकांना परवडणारे अनेक प्रिपेड प्लॅन्स आहेत. त्यामुळे नेमका कोणता प्लॅन निवडावा याबाबत अनेकांमध्ये गोंधळ उडतो. अशात जर तुम्ही 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन शोधत असाल आणि त्या प्लॅनमध्ये जास्त इंटरनेट डेटाही पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला अशाच काही प्लॅन्सबाबत माहिती देणार आहोत.

Reliance Jio चा 199 रुपयांचा प्लॅन :-
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सर्वाधिक डेटा देणारा प्लॅन म्हणजे रिलायन्स जिओचा 199 रुपयांचा प्लॅन. या प्लॅनची वैधता 28 दिवस असून यामध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा वापरण्यास मिळतो. याशिवाय दररोज 100 एसएमएसही मिळतात. दररोज 1.5 जीबी डेटा देणारा हा कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यात 28 दिवसांसाठी ग्राहकांना एकूण 42 जीबी डेटा मिळतो. यात जिओ ते जिओ कॉलिंगही मोफत आहे, तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 नॉन-जिओ मिनिटे मिळतात. याशिवाय जिओ अ‍ॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शन मिळतं. नॉन-जिओ मिनिट संपल्यानंतर ग्राहकांना 6 पैसे प्रतिमिनिट दर आकारले जातील.

Reliance Jio चा 149 रुपयांचा प्लॅन :-
जिओच्या 149 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1जीबी डेटा म्हणजेच एकूण 24जीबी डेटा मिळतो. 24 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये जिओ नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तर, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी कंपनीकडून 300 नॉन-जिओ FUP मिनिटे मिळतात. 100 फ्री एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचं फ्री सबस्क्रिप्शनही या ऑफरमध्ये मिळेल.

(Reliance Jio चा स्वस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 3.5 रुपयांमध्ये 1 GB डेटा; जाणून घ्या डिटेल्स)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Reliance Jio चा 151 रुपये आणि 201 रुपयांचा प्लॅन :-
लॉकडाउनमध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्या युजर्ससाठी कंपनीने 151 रुपये, 201 रुपये आणि 251 रुपयांचे प्लॅन आणलेत. या तिन्ही प्लॅमध्ये केवळ डेटाची सुविधा मिळते, कॉलिंगची सेवा यामध्ये मिळत नाही. तिन्ही प्लॅची वैधता ३० दिवस आहे. 151 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 30जीबी, 201 रुपयंच्या प्लॅनमध्ये 40जीबी आणि 251 रुपयांच्या पॅकमध्ये 50जीबी डेटा मिळतो.