टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या एअरटेल, रिलायंस जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यांच्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळतेय. टॅरिफ दरवाढीनंतर या कंपन्यांनी नवे रिचार्ज प्लॅन्स लाँच केले, पण त्यानंतर वारंवार आपल्या प्लॅन्समध्ये फेरफार केले. कंपन्यांकडून रिचार्ज प्लॅनमध्ये सतत बदल केले जात असल्यामुळे नेमका कोणता प्लॅन घ्यायचा याबाबत अनेक ग्राहक संभ्रमात असतात, तर अनेकजण हा गोंधळ टाळण्यासाठी एकदाच वर्षभराचा प्लॅन घेतात. पण एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि जिओ यापैकी कुणाचा प्लॅन बेस्ट असेल याबाबत अनेकांना प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे जाणून घ्या कोणता प्लॅन तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.
Vodafone चा 365 दिवस वैधता – 365 दिवसांची वैधता असलेले व्होडाफोनचे दोन प्लॅन उपलब्ध आहेत. यातील एक प्लॅन 1499 रुपयांचा आणि दुसरा 2, 399 रुपयांचा आहे. 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3600 एसएमएस आणि 24 जीबी इंटरनेट डेटा, तसंच कुठल्याही नेटवर्कला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. तर, 2, 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस, तसंच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. या दोन्ही प्लॅनमध्ये Vodafone Play आणि ZEE5 चे सबस्क्रिप्शन मिळेल.
आणखी वाचा – Vodafone ने आणले चार शानदार प्लॅन, 24 रुपयांपासून सुरूवात
Airtel चा 365 दिवसांचा प्लॅन – एअरटेलकडेही 365 दिवसांची वैधता असलेले दोन प्लॅन उपलब्ध आहेत. यातील एक 1498 रुपये आणि दुसरा 2, 398 रुपयांचा आहे. 1498 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3600 एसएमएस, 24 जीबी इंटरनेट डेटा आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. तर, दुसऱ्या 2, 398 प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. या दोन्ही प्लॅनमध्ये airtel extreme, Zee5 आणि Wynk Music या अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल.
Reliance Jio चा 365 दिवसांचा प्लॅन – रिलायंस जिओचेही 365 दिवस वैधता असलेले दोन प्लॅन आहेत. पहिला प्लॅन 1299 रुपयांचा तर, दुसरा प्लॅन 2,199 रुपयांचा आहे. 1299 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 24 जीबी इंटरनेट डेटा मिळेल, तसंच या प्लॅनमध्ये डेटाच्या वापरावर मर्यादा नाहीये. याशिवाय जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉल, इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 12,000 FUP मिनिटे आणि 36०० एसएमएसची सुविधाही आहे. तर, 2,199 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा म्हणजे एकूण 547.5 जीबी डेटा, जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग, इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 12,000 FUP मिनिटे आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. याशिवाय दोन्ही प्लॅनमध्ये Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते.